Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात सायबर चोरट्याचा प्रताप! ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे’ वडिलांना व्हिडीओ कॉल केला, मुलीचे हात-पाय बांधलेले दाखवले अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 22 June 2026, 19:32

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा शोध सुरू असताना अज्ञात व्यक्तींनी तिच्या वडिलांना मुलीचे अपहरण झाल्याचे भासवून 15 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या 17 तासांत मुलीचा शोध घेऊन तिला झारखंडमधून सुखरूप ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. यानंतर तिच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली.

याच काळात मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्याने मुलगी त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला. व्हिडिओमध्ये मुलीचे हातपाय बांधलेले असल्याचे दाखवत 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मुलीच्या सुरक्षिततेच्या चिंतेत असलेल्या वडिलांनी घाबरून तीन हप्त्यांमध्ये एकूण 15 हजार रुपये संबंधित खात्यावर पाठवले.

 

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू ठेवत पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये मुलगी हावड्याकडे जाणाऱ्या रेल्वेत बसल्याचे दिसून आले. त्यानंतर झारखंडमधील टाटानगर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुलीचा शोध घेण्यात आला आणि तिला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

तपासात समोर आले की, मुलीचा शोध लागावा म्हणून तिचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली होती. त्याच माहितीचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी बनावट अपहरणाचा व्हिडिओ तयार केला आणि वडिलांची फसवणूक केली.

या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुमची गाडी किती जुनी आहे? केंद्र सरकार आणतंय ‘PUCC 3.0’; जाणून घ्या आता गाडीच्या नियमात काय बदलणार

Tuesday, 23 June 2026, 22:53

पुण्यात लुटेरी दुल्हनचा कारनामा! तरुणाला जाळ्यात ओढलं, बनावट विवाह रचला अन् घरी परतताना फरार…

Tuesday, 23 June 2026, 22:31

पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका! 15 गंभीर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार एटीएसच्या जाळ्यात

Tuesday, 23 June 2026, 21:38

नागपूरची कमान आता नांगरे पाटलांच्या हाती! 14 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न

Tuesday, 23 June 2026, 20:51

सोने सांगवीत सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भिंतीवर आदळला,सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Tuesday, 23 June 2026, 20:46

उरुळी कांचन येथे दुचाकी गाडीच्या डिक्कीतून भरदिवसा 81 हजार रुपये पळवले; उरुळी कांचन पोलिसांचा फिर्यादीला ‘लोणीकंद’ला जाण्याचा सल्ला..

Tuesday, 23 June 2026, 20:19
Next Post

रस्त्यावर रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न मृतदेह, कारचा चेंदामेंदा अन् विखुरलेले अवशेष; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.