Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल जवळ भरधाव वाहनाची तरुणाला धडक; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 21 September 2026, 18:09

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर गारवा हॉटेलजवळ रस्ता ओलांडत असलेल्या तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत धडक देऊन जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र अजिनाथ जगताप (वय 30, रा. कोरेगाव मूळ, कानकाटे वस्ती, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मयताचा भाऊ विशाल अजिनाथ जगताप, (वय 31, धंदा-ड्रायव्हर, रा, सदर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र जगताप हे उरुळी कांचन येथील गुरु हॉटेलमध्ये मजुरीचे काम करीत होते. सोमवारी (ता. 14) सप्टेंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास ते गारवा हॉटेलजवळ सोलापूर-पुणे महामार्गावरून पायी रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रविंद्र यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहनचालकाने थांबून जखमीला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले.

अपघाताची माहिती मिळताच रविंद्र यांना प्रथम उरुळी कांचन येथील श्री सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी (ता. 20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अपघात करून जखमीला रस्त्यावरच सोडून पसार झालेल्या वाहनचालकाचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि मृत तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र गोसावी करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सूर्यनमस्कारातून आरोग्याचा संदेश; यथार्थ योग स्टुडिओच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Monday, 21 September 2026, 18:46

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुका अध्यक्षपदी वंदना काळभोर

Monday, 21 September 2026, 18:36

“उरुळी कांचन येथे जेवणासाठी गाडी पार्क करताना काळाचा घाला” ऊसाच्या ट्रॉलीखाली पाय सापडून एकजण गंभीर जखमी

Monday, 21 September 2026, 18:24

गणेश उत्सवानिमित्त एसजीए ग्रुपचा स्त्युत्य उपक्रम, रक्तदान शिबिरात 111 बाटल्यांचे संकलन

Monday, 21 September 2026, 18:20

पुणेकरांच्या खिशाला बसणार मोठा फटका! पार्किंग शुल्कात तब्बल दुप्पट-तिप्पट वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

Monday, 21 September 2026, 18:14

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल जवळ भरधाव वाहनाची तरुणाला धडक; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Monday, 21 September 2026, 18:09
Next Post

पुणेकरांच्या खिशाला बसणार मोठा फटका! पार्किंग शुल्कात तब्बल दुप्पट-तिप्पट वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp