Tuesday, July 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्या वैमनस्यातून बिहारच्या तरुणाची हत्या! लखन शिरसकर यांच्यामुळे तपासाला निर्णायक वळण; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 20 July 2026, 18:53

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर शिक्रापूर पोलिस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या तीन दिवसांत उकलले आहे. बिहारमधील २२ वर्षीय तरुणाची ओळख पटवत जुन्या वैमनस्यातून झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

१७ जुलै रोजी पाझर तलावात एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

मृतदेह अनेक दिवस पाण्यात असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. मृताचे कपडे, छायाचित्रे आणि इतर माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. तसेच विविध राज्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी सुरू करण्यात आली.

तपासाला निर्णायक वळण पोलीस शिपाई लखन शिरसकर यांच्या सतर्कतेमुळे मिळाले एल अँड टी फाटा परिसरात कर्तव्यावर असताना त्यांना मृताच्या नातेवाईकांची माहिती मिळाली. त्यानंतर केलेल्या पडताळणीत मृताची ओळख टुटुकुमार अजीत यादव वय २२, मूळ रा. जेहानाबाद, बिहार अशी पटली.

यानंतर तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी पुष्करकुमार अरुण यादव, आयुष्मान सुशील पांडे आणि सचिन मारुती हिंगेवार या तिघांना अटक केली आहे.

चौकशीत मुख्य आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, शेतातील वीजपंप चोरी केल्याचा संशय त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान तसेच आरोपीच्या बहिणीच्या प्रेमसंबंधांना मृताकडून मिळणारी साथ आणि सोशल मीडियावरील फोटो-स्टोरी यामुळे आरोपीच्या मनात तीव्र राग निर्माण झाला होता. याच वैमनस्यातून साथीदारांच्या मदतीने टुटुकुमार यादव याची हत्या करून मृतदेह पाझर तलावात फेकण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स.पो.नि हनुमंतराव गिरी,उमांकात कुंजीर, सोमनाथ कचरे,नितीन सुद्रिक, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहीदास पारखे, अमोल नलगे, नवनाथ नायकडे, मिलींद देवरे, चंद्रकात काळे, संदीप करांडे,लखन शिरसकर, मच्छिंद्र निचीत, राम जाधव, नारायण वाळके व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रा. पथकाचे पो.स.ई महेश डोंगरे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, राजु मोमीन, विकास पाटील, स्त्रगर धुमाळ यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.

आपदा टिमचे शेरखान शेख, वैभव निकाळजे, गणेश टिळेकर, श्रीकांत भाडळे, महेश साबळे व राहुल गायकवाड तसेच ॲम्बुलन्स मधील अमोल नपते, रोहीत थोरात यांनी मदत केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले हे करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर गुन्हेगारांचे पुण्यात ‘नेटवर्क’ सक्रिय! कोट्यवधींच्या फसवणुकीची साखळी उघड

Monday, 20 July 2026, 22:59

औंधमधील हॉटेलमध्ये हप्तावसुलीसाठी तोडफोड; तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार

Monday, 20 July 2026, 22:29

NEET प्रकरण, शिक्षक भरतीसह विविध मागण्यांसाठी इंदापूरमध्ये मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Monday, 20 July 2026, 22:26

पुण्यात ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Monday, 20 July 2026, 21:33

बारामतीत कृत्रिम दूधनिर्मितीच्या संशयित रॅकेटचा पर्दाफाश? आठ जणांवर गुन्हा

Monday, 20 July 2026, 20:54

मेटल डिटेक्टरने केला गेम! सुनावणीवरून कारागृहात परततांना आरोपीची अंगझडती घेतली अन् जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले..

Monday, 20 July 2026, 20:15
Next Post

"जनता तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते आणि आपटूही शकते!" रोहिणी खडसेंचा थेट सरकारवर घणाघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.