Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 October 2026, 20:16

पंढरपूर: पंढरपूरमध्ये 23 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री समोर आली. मृत तरुणाचे नाव शुभम मोनाप्पा सुतार (वय 23) असून तो मूळचा सिद्धनाथ, ता. जत, जि. सांगली येथील रहिवासी होता. सध्या तो पंढरपुरातील गाडगे महाराज चौक परिसरात राहत होता. मृत्यूपूर्वी शुभमने आपल्या आईला पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

रविवारी दुपारी दीडच्या सुमारास शुभमने आईला लक्ष्मी टाकळी येथील लक्ष्मी हॉटेलचे लोकेशन पाठवले. यासोबतच ‘आई, इथे मला मारायला लागलेत, लवकर ये, मला वाचव’ असा संदेश पाठवला. मुलाचा मेसेज मिळताच आईने तातडीने लक्ष्मी हॉटेलच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तेथे शुभम आढळून आला नाही.

दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास शुभमचा भाऊ संदीप याला रस्त्यावर एका मित्राची कार दिसली. संशय आल्याने त्याने कारजवळ जाऊन पाहिले असता शुभम गंभीर जखमी अवस्थेत कारमध्ये पडलेला दिसला. त्याच्यात कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. कारमधील तिघांनी शुभमला ‘पंधरा मिनिटांत घरी आणून सोडतो,’ असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी तेथून कारसह पळ काढला.

संदीपने संशयावरून कारचा पाठलाग सुरू केला. ही कार थेट पंढरपुरातील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शुभमला मृत घोषित केले.

 

या घटनेनंतर पंढरपूर परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शुभमला नेमकी कोणत्या कारणातून मारहाण करण्यात आली, त्याचा मृत्यू कशामुळे झाला आणि कारमधील तिघांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12

पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सापडलं! भावड्यानं डायरेक्ट पत्ताच सांगितला; खाक्या दाखवताच तोंड उघडलं, नेमकं काय घडलं?

Tuesday, 6 October 2026, 20:06
Next Post

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; 'बायकोला परत आणा' म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp