Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाबळेश्वर येथे घरात डोकावल्याच्या संशयावरून भिगवणच्या तरुणाची हत्या; चौघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 July 2026, 10:31

सागर जगदाळे

भिगवण, दि. १० (प्रतिनिधी): महाबळेश्वर तालुक्यातील भोसे गाव परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या भिगवण येथील तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या झिरो क्रमांकाच्या गुन्ह्याच्या आधारे पाचगणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, अक्षय जाधव हा त्याचा मित्र विशाल अजित जाधव (रा. बोरी) व इतर मित्रांसमवेत ८ जुलै रोजी महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी गेला होता. सायंकाळी त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील भोसे गावातील ‘अतिथी व्हिला हॉटेल अँड लॉज’ येथे मुक्काम केला. रात्री सर्व मित्रांनी मद्यप्राशन केले. त्यावेळी अक्षयने अधिक प्रमाणात मद्यप्राशन केल्याने मित्रांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तो हॉटेलच्या खोलीत झोपण्यासाठी गेला.

 

रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मित्रांनी त्याला जेवणासाठी बोलावण्याचा प्रयत्न केला असता तो खोलीत दिसून आला नाही. खोलीच्या मागील बाजूची खिडकी उघडी असल्याने तो तेथून बाहेर गेला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मित्रांनी परिसरात शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, संशयित आरोपींच्या घरात अक्षय डोकावत असल्याचा संशय स्थानिकांना आला. यावरून संतप्त झालेल्या काही स्थानिकांनी अक्षयला लाकडी काठ्या, दांडे तसेच लाथाबुक्क्यांनी अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. काही वेळाने हॉटेलपासून सुमारे २०० मीटर अंतरावर अक्षय गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.

जखमी अक्षयला प्रथम पाचगणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी वाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यानंतर त्याला बारामती येथील डॉ. बोके रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अक्षय जाधव याला मृत घोषित केले.

या प्रकरणी सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कणूर, ता. वाई) आणि अमोल गंगादेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला झिरो क्रमांकाचा गुन्हा पाचगणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पाचगणी पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत चौघांनाही अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

दरड कोसळली, गावकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी गाव सोडले अन् रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी मारला डल्ला; लोणावळा येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.