राहुलकुमार अवचट
यवत :- संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा ३३७ वा पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र पंढरपूरहुन देहूकडे परतीचा प्रवास सुरु झाला आहे. बुधवारी (ता. २०) पालखी सोहळ्याने यवत (ता. दौंड ) येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात सकाळी १२ च्या सुमारास आगमन झाले. यवतकरांनी परतीच्या मार्गावर असलेल्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
श्री क्षेत्र पंढरपूरहुन नगरप्रदक्षिणा करून पालखी सोहळा बुधवारी (दि. १३) परतीच्या प्रवासाला निघाला असुन मंगळवारी (ता. १९) वरवंड येथील मुक्काम आटोपून सकाळी आरतीनंतर पालखीने देहूच्या दिशेने प्रस्थान केले. दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा यवत ग्रामपंचायत हद्दीतील विसावला.
यावेळी पालखी बरोबर असलेल्या वारकऱ्यांसाठी यवत येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विसावा आटोपून पालखीने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास देहुकडे प्रस्थान केले. बुधवारी (ता. २०) पालखी सोहळ्याचा मुक्काम उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आहे. रविवारी (ता. २४) श्री क्षेत्र देहूला येथे दाखल होईल.