राहुलकुमार अवचट
(Yavat News) यवत : राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दौंड तालुक्याच्या मध्य पट्ट्यातील यवत, वरवंड, बोरीपार्धी, पाटस, कडेठाण आदी गावात आठवड्यात अचानक (Yavat News) झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईसाठी सरकारकडे आस लावून बसले आहेत.
शेतकरी हवालदिल…!
गहु, कांदा, हरबरा, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर, पालेभाज्य आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी करत आहेत. मात्र जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय आणि निम-शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचाही फटका बसल्याचे दिसून येत आहे.
आता संप मिटला असून संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे वेगाने करावेत. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच तातडीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!