Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime News: बोरीपार्धीत सामाईक बांध नांगरण्यास विरोध केल्याने शेतकऱ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर ; पाठीवरून चाक गेल्याने गंभीर जखमी, दोघांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 24 May 2026, 15:25

यवत, (पुणे) : शेताचा सामाईक बांध नांगरण्यास विरोध केला म्हणून एका 54 वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर थेट ट्रॅक्टर चालवून त्याला जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. बोरीपार्धी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील जमीन गट नं ६/६ मध्ये बुधवारी (ता. 20) हि घटना घडली. (Yavat Crime News)

धनाजी मल्हारी नवसे वय 54, व्यवसय शेती रा. बोरीपार्धी, टेंगलेमळा ता. दौंड) असे मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर विलास शंकर दिवेकर, व रविंद्र विलास दिवेकर (रा. दोघेही वरवंड ता दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बाप लेकाची नावे आहेत. या घटनेत ट्रॅक्टरचे मोठे चाक पाठीवरून गेल्याने नवसे हे जखमी झाले असून, याप्रकरणी यवत पोलिसांनी बाप-लेकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार ‘जीवे मारण्याचा प्रयत्न’ केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनाजी नवसे हे बुधवारी आपल्या शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. त्याच वेळी आरोपी विलास दिवेकर आणि त्याचा मुलगा विलास दिवेकर हे त्यांच्या सामाईक शेताचा बांध ट्रॅक्टरने नांगरत होते. धनाजी नवसे यांनी त्यांना “सामाईक बांध का नांगरत आहे?” असा जाब विचारला. याचा राग येऊन दोन्ही आरोपींनी नवसे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

 

मारहाण करूनही आरोपी पुन्हा जबरदस्तीने बांध नांगरू लागल्याने, नवसे हे विरोध करण्यासाठी सामाईक बांधावर जाऊन उभे राहिले. यावेळी आरोपी रविंद्र दिवेकर याने धनाजी नवसे यांचा जीव जाऊ शकतो हे पूर्णपणे माहीत असतानाही, त्यांच्या अंगावर थेट ट्रॅक्टर (क्र. MH 12 VB 4212) घातला ट्रॅक्टर थेट अंगावर आल्याने नवसे खाली कोसळले आणि ट्रॅक्टरचे मोठे जड चाक त्यांच्या पाठीवरून गेले. या भयंकर प्रकारात नवसे यांच्या पाठीला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असे फिर्यादीत म्हटले आहे.

यावेळी आरोपींनी “पुन्हा आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी देऊन दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी नवसे यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी धनाजी नवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वागज हे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: गुरुपौर्णिमेचा महायोग! आजपासून बदलणार तुमचं नशीब? 12 राशींसाठी मोठी भविष्यवाणी

Wednesday, 29 July 2026, 7:25

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32
Next Post
Uruli Kanchan News: Fire breaks out in computer lab of Zilla Parishad School in Naigaon; Materials worth Rs 1 lakh burnt due to short circuit..

Uruli Kanchan News : नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या संगणक कक्षाला आग; शॉर्ट सर्किटमुळे 1 लाखांचे साहित्य जळून खाक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.