Yavat यवत : दौंड पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर आण्णा कृष्णाजी दोरगे यांना पितृशोक झाला असून, त्यांचे वडील भांडगाव ग्रामपंचायतचे प्रथम सरपंच व दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णाजी (बापू) शंकरराव दोरगे यांचे वयाच्या ९५ वर्षी वृद्धापकाळाने आज सकाळी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज सायं. ४ वा. भांडगाव वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहे. दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दोरगे व भांडगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच संतोष दोरगे हे त्यांचे नातू होत.