Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वालचंदनगर पोलिसांकडून शेतकऱ्यांचे साहित्य लांबवणारी टोळी गजाआड ; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना बेड्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 August 2026, 18:46

इंदापूर, (पुणे) : वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्यांचे शेती साहित्य, सोलर मोटार पंप, ट्रॅक्टर, ट्रॉली, चारचाकी पिकअप वाहने आणि केबल वायर चोरणाऱ्या टोळीचा वालचंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 सराईत चोरांच्या टोळीला अटक केली आहे.

जयदीप नानासो घोळवे (वय 22, रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे), मेघराज नानासो आंबासे (वय -22 रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) आकाश विलास शिंदे(वय-23, रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत वाढत्या शेती साहित्य चोरीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. त्यानुसार वालचंदनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्तीवर असताना, पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड व पोलीस अंमलदार गणेश वानकर यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, जयदीप घोळवे व त्याचे साथीदार लाकडी, शिंदेवाडी आणि भवानीनगर परिसरातून शेतकऱ्यांच्या ट्रॉली चोरी करत आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी भवानीनगर परिसरात सापळा रचून जयदीप घोळवे व मेघराज आंबासे या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी आकाश शिंदे याच्या साथीने वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप व मोटार चोरी केल्याची कबुली दिली.

 

दरम्यान, आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एक न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, एक चार चाकी ट्रॉली, एक महिंद्रा कंपनीची चारचाकी पिकअप गाडी, एक सौरऊर्जा संचलित मोटार पंप (सोलर पंप), ट्रॉली चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर असा मुद्देमाल मिळून आला. तिघांवरही वालचंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)** अन्वये नोंद असलेले 3 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी पोवरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक *राजकुमार डुनगे*, पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल माणेर, अजित भाग्यवंत, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजित कळसकर व राहुल माने यांनी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर!

Tuesday, 4 August 2026, 20:55

‘गुंगी गुडिया’ टीकेला सुनेत्रा पवारांचा 5 शब्दांत सणसणीत पलटवार; काँग्रेसची बोलती बंद!

Tuesday, 4 August 2026, 20:35

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऐन पावसाळ्यात शहराच्या ‘या’ महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Tuesday, 4 August 2026, 20:06

शरद पवारांचा मोठा निर्णय! पक्षातील बड्या नेत्यांना पदावरून हटवलं; तातडीचे आदेश जारी

Tuesday, 4 August 2026, 19:43

पुण्यात लाचखोरीचा पर्दाफाश! २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून मागितली १० लाखांची लाच; शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील प्रकाराने महसूल विभागात खळबळ

Tuesday, 4 August 2026, 19:30

राशीनच्या श्री जगदंबा मंदिर प्रकरणाला नवे वळण ..! मंदिराच्या मोजणीला न्यायालयाची स्थगिती

Tuesday, 4 August 2026, 19:29
Next Post

रामदरा रोडवर भरधाव अवजड वाहतुकीचा धुमाकूळ; संतप्त नागरिकांचा एल्गार, पोलिसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.