Friday, August 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रामदरा रोडवर भरधाव अवजड वाहतुकीचा धुमाकूळ; संतप्त नागरिकांचा एल्गार, पोलिसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 August 2026, 18:48

लोणी काळभोर : तीर्थक्षेत्र रामदरा रोड आणि सिद्राम मळा परिसरातून सुरू असलेल्या भरधाव अवजड वाहतुकीविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मार्गावरून नियमबाह्य व धोकादायक पद्धतीने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. ४) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.

यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर उर्फ सनी काळभोर, भाजपचे हवेली सरचिटणीस कमलेश काळभोर, माजी सरपंच योगेश काळभोर, राष्ट्रवादीचे युवराज काळभोर, माजी चेअरमन विठ्ठल काळभोर, प्रशांत बबन काळभोर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून फुरसुंगी रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावरून सिमेंट, लोखंड तसेच पुणे महापालिकेच्या कचऱ्याची वाहतूक करणारे ट्रेलर, टिपर आणि इतर अवजड वाहने रामदरा रोडवरून सातत्याने धावत आहेत. तब्बल ४० ते ५० टनांहून अधिक वजन घेऊन अतिवेगाने धावणाऱ्या या वाहनांमुळे परिसरातील नागरिक, दुचाकीस्वार, पादचारी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असून, समोरून येणाऱ्या वाहनांना किंवा पादचाऱ्यांना रस्ता देण्याचीही तसदी घेत नाहीत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या समस्येबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाहतूक रोखल्याचे कारण पुढे करून संबंधित ठेकेदाराने एका नागरिकाविरोधात खंडणीचा अर्ज दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अवजड वाहनांचा वेग आणि बेफिकीर वाहतूक अद्यापही कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

रामदरा रोडवरील अवजड वाहनांच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणावे, वाहतूक पोलिसांचे नियमित पथक तैनात करावे, तसेच संबंधित कंपन्या व ठेकेदारांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशीही एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.

“लोणी काळभोरमधील कोणत्याही शेतकऱ्याने खंडणीची मागणी केलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जनहितासाठीच आम्ही अवजड वाहतुकीला विरोध करत आहोत. रेल्वे प्रशासनाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चुकीचा अर्ज दिला आहे. या अवजड वाहतुकीस कोणतीही अधिकृत परवानगी नसून, पोलीस प्रशासनानेही ती थांबवण्याचे आश्वासन दिले आहे.”

– युगंधर उर्फ सनी काळभोर
माजी उपसभापती, पंचायत समिती हवेली

“फुरसुंगी येथील मालधक्क्यातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीचा नाहक त्रास लोणी काळभोरच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या कथित अनधिकृत वाहतुकीला नागरिकांनी लोकशाही मार्गाने विरोध केला असताना, शेतकऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चुकीचा अर्ज दिल्याचा आमचा आरोप आहे. राजकीय दबाव टाकून शेतकऱ्यांना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. गरज पडल्यास प्रशासनाविरोधात तीव्र लोकशाही लढा उभारू.”

– कमलेश काळभोर
सरचिटणीस, हवेली भाजप

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी प्रकरणाची चौकशी; जिल्हा शल्य चिकित्सकांकडून समिती स्थापन करण्याचे आदेश

Thursday, 6 August 2026, 22:58

आंबळे परिसरातील बिबट्याची दहशत अखेर संपली; वन विभागाच्या पिंजऱ्यात चार वर्षीय नर बिबट्या जेरबंद…..

Thursday, 6 August 2026, 22:44

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 पदांवर भरती,पवित्र प्रणालीद्वारे भरतीचा मार्ग मोकळा

Thursday, 6 August 2026, 22:32

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! CEIR पोर्टलच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती; सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल परत

Thursday, 6 August 2026, 21:31

अवैध गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर कोंढवा पोलिसांचा ‘मोक्का’चा बडगा; टोळीप्रमुखासह पाच जणांविरुद्ध कारवाई

Thursday, 6 August 2026, 21:19

मोठी बातमी! नवीन टॅक्स दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; कर, गुंतवणूक ते TDS… जाणून घ्या सर्व मोठे बदल

Thursday, 6 August 2026, 20:48
Next Post

राशीनच्या श्री जगदंबा मंदिर प्रकरणाला नवे वळण ..! मंदिराच्या मोजणीला न्यायालयाची स्थगिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.