उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विजय विठ्ठल चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय रामचंद्र गुळुंजकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नायगाव (Naigaon Dispute Resolution Committee) येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली. (pune latest news)
मावळते अध्यक्ष बापूसाहेब बबन चौधरी व उपाध्यक्ष संजय सोमाजी चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया नायगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच सरपंच कल्याणी हगवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत ग्रामसेविका विजया भगत यांनी अध्यक्षपदी विजय चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय गुळुंजकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी उपसरपंच दत्तात्रय बारवकर, गणेश चौधरी, जितेंद्र चौधरी, संगीता शेलार, पल्लवी गायकवाड, उतम शेलार, बाळासाहेब गायकवाड , प्रियंका गायकवाड, कृष्णा चौधरी, विकास चौधरी, विठ्ठल चौधरी, शिवाजी चौधरी, माया चौधरी, कल्पना पवार, पोलीस पाटील अर्जुन पवार, रामचंद्र पवार, संतोष हगवणे, पोपट चौधरी, उत्तम घुले, ज्ञानोबा शेलार, योगेश चौधरी, नितीन हगवणे, रामचंद्र माने, बापू चौधरी, विजय चौधरी, गणेश चौधरी, अर्जुन चौधरी, विठ्ठल हगवणे, किरण गुळुंजकर, संजय खेडेकर, कैलास चौधरी, भाऊसाहेब चौधरी, नवनाथ गायकवाड, अमोल खेडेकर, किरण चौधरी, अविनाश चौधरी, युसुफ शेख, शांताराम उरसळ, गोरख चौधरी, नंदू चौधरी, संजय चौधरी, सुनील हगवणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणाले, “गावातील तंटे गावातच सर्वांना बरोबर घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.”







