युनूस तांबोळी
शिरूर : दिवाळी म्हटले की, प्रत्येक घरी गोडधोड खाद्य पदार्थ, फराळ बनविला जातो. आपल्या आसपास समाजामध्ये आर्थीक विषमतेतून अनेक असाह्य निराधार कुटूंब असतात. या कूटंबातील मुलांची आपल्या सोबत त्यांचीही दिवाळी गोड व्हावी. या उद्देशाने कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनच्या वतीने शिरूर तालुक्यातील 40 गावांमध्ये प्रदुषण मुक्त दिवाळी व एक दिवा वंचीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील 40 गावामध्ये वंचीत घटकातील कुटूंबाचा शोध घेऊन त्यांच्या मुलांसाठी एक दिवा वंचीसाठी उपक्रम अतीशय महत्वाचा ठरला आहे. कोरोना महामारीत श्वास घ्यायला त्रास होत असताना आजही प्रदुषणावर अटकाव आणला जात नाही. लाखो रूपयांचे रंगीबेरंगी फटाके फोडून प्रदुषणात भर घातला जात आहे. प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात फटाके ची दुकाने थाटली गेली. पण यासाठी प्रशासन देखील यावर बंदी आणत नाही.
पण संस्थेच्या माध्यमातून भविष्यातील पिढीला याचे दुषपरीणाम सोसावे लागणार आहे. याची अनुभूती देण्यासाठी हा प्रबोधनाचा विषय घेऊन या संस्थेने अतीशय महत्वाचे काम केले आहे. एक दिवा वंचीतासाठी हा उपक्रम राबवून या मुलांमध्ये माणुसकीने वंचीतामध्ये जागृती निर्माण केली आहे. त्यांच्या मना मध्ये दिवाळी ची संस्कृती उभी करून शिक्षणावर भर दिला आहे. यासाठी त्यांच्या सोबत खाऊ चे वाटप करण्यात आले होते.
यासाठी प्रकल्प अधिकारी सुभाष गटकने ,अमोल राठोड ,वैशाली चव्हाण, पद्मश्री दीक्षित, रुपाली बोरडे, मयुरा दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रत्येक मुलाचा भाकरी, खेळ, शिक्षण व प्रेम हा अधिकार असून तो देण्यासाठी समाजातून पुढाकार घेतला पाहिजे असे प्रकल्प अधिकारी सुभाष गटकने यांनी सांगितले.
समाजामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात वंचीतामध्ये आर्थीक विषमतेची दरी आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांना दिवाळीचा गोडवा मिळत नाही. याउलट समाजामध्ये श्रीमंतामध्ये प्रदुषणाची चढाओढ लागली आहे. दिवाळी सारख्या सणात खरे तर फटाके मुक्त दिवाळी साजरी होणे आवश्यक आहे. मात्र प्रदुषण वाढविण्याचे काम केले जाते. वंतीच गरीब कूटूंबाना यावेळी फटाक्यात लाखो रूपये खर्च करण्यापेक्षा खाऊ चे वाटप करणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील विविध संस्थानी पुढाकार घ्यावा.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी वैशाली चव्हाण