राहुलकुमार अवचट
यवत – परिसरात अनेक लोक लांब वाड्यावस्त्यांवर राहतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला स्मशानभूमी पर्यंत नेण्यास अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळेच खामगाव व परिसरातील काही तरुणांनी एकत्र येऊन वैकुंठरथाची संकल्पना मांडली. लोकवर्गणीतून या वैकुंठरथाची निर्मिती करण्यात आली होती. या रथाचे लोकार्पण आदेश सरपंच भास्करराव पेरे पाटील, दौंडच्या माजी आमदार रंजना कुल, पुणे जिल्हा बँकेचे संचालक, माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करून लोकार्पण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. डॉ. संदिप खेडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. वैकुंठरथ संकल्पना ज्यांच्यामुळे अस्तित्वात आली असे नित्यानंद जगताप यांनी प्रास्तविक केले. यात थेऊर येथील वैकुंठरथ पाहुन आपल्या परिसरात देखील असे काही करता येईल का याभावनेतुन गावातील तरुणांकडे यांची संकल्पना मांडली. तरुणांनीही यासाठी पुढाकार घेत आज या वैकुंठरथा लोकार्पण सोहळा संपन्न होत असल्याने आनंद व्यक्त आहे.
खामगाव येथे ५ वार्ड असुन कोव्हीड काळात खांदेकरी मिळत नसल्याने वाड्यावस्तीवरील नागरिकांना मानसिक यातना भोगाव्या लागत होत्या. याकाळात ही संकल्पना उदयास आली यासाठी ०६ लाख रुपयांचा खर्च झाला असुन ही सुविधा मोफत पुरवली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. यावेळी जगताप यांनी देणगीदारांचे आभार व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांनी हेवेदावे विसरुन एकत्र येऊन सार्वजनिक कामे करावी, स्मशानभुमी लांब असलेल्या ठिकाणी वैकुंठरथ ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त करत यासाठी पुढाकार घेतलेल्या तरुणांचे अभिनंदन केले
यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता, स्वच्छपाणी, शिक्षण, फळ झाडांची लागवड, गावातील निराधार लोकांना संभाळणे ही कामे ग्रामपंचायत प्रशासनाने केली पाहिजे अशी भावना व्यक्त केली. वैकुंठरथाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याने आयोजकांचे आभार व्यक्त करत याकार्यासाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन केले.
यावेळी नीलेश यादव, प्रतिक मोडक, डॉ. विजय कुल, ग्रामपंचायत सदस्य सुखदेव चोरमले, मिरवडीचे सरपंच सागर शेलार, विलास नागवडे आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बर्वे यांनी सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले.