अजित जगताप
Vaduj New वडूज : खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीमध्ये तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतील काम ठेकेदारांनी केले. परंतु, त्याचे अंतिम बिल न मिळाल्याने निराशा पोटी व त्रागापोटी ठेकेदार बाळू रामचंद्र सावंत (रा. जायगाव ता. खटाव) यांनी आज दुपारी एक वाजता खटाव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात शेतातील तन मारण्याचे विष प्राशन करून बिल न मिळाल्याचा निषेध व्यक्त केला. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार…!
जायगाव येथील ठेकेदार बाळू सावंत यांनी तीन वर्षांपूर्वी कोटेश्वर वस्ती शंकर मंदिर रस्ता व खोदाड विहीरीचे काम केले होते. त्या कामाची मजुरी म्हणून त्यांनी बिल पाठवले होते. परंतु बिलासोबत प्रचलित धोरणानुसार काही गोष्टीची पूर्तता न केल्यामुळे त्यांना बिल मिळण्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या. आपले बिल मिळून देणेकरांची देणे भगावे. या अशा पोटी गेले दोन वर्षे त्यांनी शंभर फेऱ्या मारल्या. पण, त्यांना कोणीही दाद दिली नाही
अखेर रागा व निराशा पोटी त्यांनी पंचायत समितीच्या आवारातील उपाहारगृहाशेजारीच खुर्चीवर बसून सुमारे अर्धा लिटर कीटक नाशक औषध पिऊन आपली जीवन यात्रा संपवण्याचा डाव केला होता. परंतु, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते व काही पत्रकारांनी काढता पाय घेतला तर काहींनी तातडीने सावंत यांचे नातेवाईक आल्यानंतर त्यांना वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या ठिकाणी डॉ. राजेश देवकर, डॉ. सम्राट भादुले व परिचारिका सोनाली खुडे यांनी तातडीने उपचार करून त्यांच्या पोटातील कीटकनाशक बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अधिक उपचारासाठी त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा येथे पाठवण्यात आलेले आहे.
दरम्यान , सध्या ठेकेदार बाळू सावंत यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत वडूज नगरीला भेट देणारे विरोधी पक्ष नेते अजित पवार व संबंधितांनी दखल घ्यावी अशी मागणी होऊ लागलेली आहे
सदर बिलाची रक्कम ही १३ लाख रुपये इतकी असून त्याचे व्याज पाहता सदर ठेकेदाराला अडीच ते तीन लाख रुपयांचा फटका बसणार आहे. ग्रामसेवक, वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी- कर्मचारी अशांच्यामुळे कीटनाशकांचा वापर करावा लागत ही आहे. ही लोकशाहीची चेष्टा असून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वडूज गावचे सुपुत्र व मनसे सातारा जिल्हा संघटक सुरज लोहार यांनी दिला आहे.