Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नागरिकांचे गहाळ झालेले 10 लाख 51 हजार रुपये किंमतीचे मोबाईल उरुळी कांचन पोलिसांकडून परत; सायबर विभागाच्या प्रदीप बालगुडे यांचे कौतुक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 29 September 2026, 13:47

उरुळी कांचन (पुणे) : हद्दीत मागील सहा महिन्यांत हरवलेले किंवा गहाळ झालेले लाखो रुपयांचे मोबाईल शोधून काढण्यात उरुळी कांचन पोलिसांच्या सायबर विभागाला मोठे यश आले आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे 10 लाख 51 हजार रुपये किंमतीचे 38 मोबाईल उरुळी कांचन सायबर विभागाच्या पोलिसांनी तपास करत मूळ मालकांना मंगळवारी (ता. 29) परत दिले. पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल संबंधित नागरिकांना हस्तांतरित करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी याबाबत सायबर विभागाच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्रातील व परराज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क साधून गहाळ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले. ही संपूर्ण कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई प्रदीप शिवाजी बालगुडे यांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत उरुळी कांचन परिसरातून विविध नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. या प्रकरणी सायबर विभागाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईलचा माग काढण्यास सुरुवात झाली होती.

 

विशेष म्हणजे, पोलीस शिपाई प्रदीप बालगुडे यांनी भारतीय सैन्य दलात 17 वर्षे देशसेवा केली आहे. सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर ते गेली 4 वर्षे महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावत आहेत. सध्या ते उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सायबर विभाग आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेत तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्या या तांत्रिक कौशल्यामुळेच 10 लाख 51 हजारांचे 38 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले.

दरम्यान, आपले महागडे आणि महत्त्वाची माहिती असलेले मोबाईल पुन्हा सुखरूप हातात मिळाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी उरुळी कांचन पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि विशेषतः पोलीस शिपाई प्रदीप बालगुडे यांचे मनापासून आभार मानले. पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीचे संपूर्ण परिसरातून अभिनंदन होत आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25

आधी शिक्षकाने दोन लेकरांसह आयुष्य संपवलं ,आता मानसिक धक्यातून पत्नीचाही अंत; एकाच कुटुंबातील चौघांचा धक्कादायक मृत्यू

Tuesday, 29 September 2026, 14:23

खंडणी मागितल्या प्रकरणी निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष; तक्रारदाराने घेतली माघार

Tuesday, 29 September 2026, 14:10

मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हानिरीक्षकपदी अभिषेक कांचन तर जिल्हा उपसचिवपदी अखिल जाधव

Tuesday, 29 September 2026, 14:05
Next Post

फुरसुंगीत सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा जातीय अपमान; पत्रकारासह पांडवदंड येथील 19 जणांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp