उरुळी कांचन : दुकानाच्या बाहेर बसलेल्या (Uruli Kanchan News) एका मद्यधुंद व्यक्तीने ‘घरी जा’ म्हटल्याच्या किरकोळ रागातून एका 55 वर्षीय दुकानदारावर (Pune News) चाकूने हल्ला केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती परिसरात मंगळवारी (ता. 25) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात दुकानदार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Breaking News)

प्रभाकर नारायण तुपे (वय- 55, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे चाकू हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीचे अद्याप नाव समजू शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर तुपे यांचे दुकान आहे. यावेळी तुपे यांनी मद्यधुंद व्यक्तीला घरी जाण्यासाठी सांगितले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावरून सदर व्यक्ती हा त्याच्या घरी गेला.
काही वेळाने तो घरून येताना घरातील चाकू आणला व त्याने तुपे यांच्यावर चाकू हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी तुपे यांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात हलवले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.







