हनुमंत चिकणे
Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : दोन वाहनांच्या अपघातानंतर चारचाकी वाहनातील इसम मारतील या भीतीने रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या खाजगी बस (ट्रॅव्हल) चालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत साखरे पेट्रोल पंप परिसरात बुधवारी (ता. ०७) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Uruli Kanchan News)
दत्ता दिगंबर मोरे, (वय- ४५, रा. गोफणी, ता. देवणी, जिल्हा लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर चालक दत्ता मोरे हे सोलापूरच्या बाजूने पुण्याकडे खाजगी आरामदायी बस घेऊन निघाला होता. यावेळी पुण्याकडे येत असताना मोरे यांनी यवत परिसरात काही चारचाकी वाहनांना कट मारला होता. त्यामुळे घाबरून गेलेल्या मोरे यांनी खाजगी आरामदायी बस उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील साखरे पेट्रोल पंपासमोर उभी केली. (Uruli Kanchan News)
आपल्याला पाठीमागून येणारे वाहनचालक मारतील या भीतीने मोरे याने सदर बस उभी केली व रस्ता दुभाजक ओलांडून सोलापूरच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याकडे निघाले होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात सदर इसमाचा जागेवरच मृत्यू झाला. (Uruli Kanchan News)
दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तात्काळ मदत केली. तसेच अपघातग्रस्त व्यक्तीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी सदर इसमाचे उपचारापूर्वीच निधन झाल्याची माहिती दिली. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश गायकवाड, राजेश दराडे यांनी दाखल झाले व पुढील तपासाला सुरुवात केली. (Uruli Kanchan News)
Uruli Kanchan News : कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन इनस्टीटयूटचे विद्यार्थी शंभर नंबरी..