पुरंदर : वाळूंज (ता.पुरंदर) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अंकुश माणिक इंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी आज अध्यक्ष पदासाठी सर्जेराव शंकर इंगळे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी जाहीर केले. त्यांचा सन्मान शिवसेना शिंदे गटाचे व माजी नियोजन समितीचे सदस्य रमेश इंगळे व गावकऱ्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सचिव संतोष राऊत, ग्रामसेविका सोनाली पवार, उपाध्यक्ष मुक्ताजी जगताप, तज्ञ संचालक अशोक इंगळे, शंकर इंगळे, दत्तात्रेय मेत्रे, विठ्ठल मेत्रे, अंकुश इंगळे, लक्ष्मण मेत्रे, गोविंद इंगळे, निवृत्ती इंगळे तसेच आत्ताच झालेल्या ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच रेशमा चौरे, ग्रामपंचायत सदस्य योगिता इंगळे, सुप्रिया इंगळे, कैलास मेत्रे ,उपसरपंच कैलास इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश इंगळे, सरदार शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानचे विश्वस्त, शालेय समितीचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, शेतकरी बांधव, वाळुज गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.