योगेश शेंडगे
शिरूर : शिरूर तालुक्यातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या मुखई गावच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच महेंद्र काळे, यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर पुष्पा धोंडीबा खलसे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. गावच्या सरपंच संयोगीता पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जोत्सना बगाटे यांनी काम पाहिले.
यावेळी उपसरपंच पदासाठी खलसे यांनी अर्ज दाखल केला असता, त्यांच्या विरोधात कोणाचाही अर्ज न आल्याने उपसरपंचपदी त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बगाटे यांनी सांगितले. बिनविरोध निवड झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य आणि मुखई ग्रामस्थांनी पुष्पा खलसे यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नागरिकांना जास्तीतजास्त सुविधा देऊ व सर्व पदाधिकारी यांच्या साह्याने शासनाच्या योजना तळागाळात पोहचविण्याचे काम प्रभावीपणे करू. असे उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर खलसे यांनी सांगितले.