Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मामा काही वेळासाठी घराबाहेर गेले अन् भाच्याने उचलले टोकाचे पाऊल; शिरूरमधील घटनेने हळहळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 November 2026, 8:01

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या बुरुंजवाडी येथे एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ओम रामराव चव्हाण (वय 22, रा. बुरुंजवाडी, ता. शिरूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम याला गावी जायचे होते. त्यासाठी त्याने आपले मामा राजू राठोड यांच्याकडे वाहनाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. भाच्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजू राठोड हे रिक्षाची व्यवस्था करण्याकरिता शिक्रापूर येथे गेले. दरम्यान, ते घराबाहेर असतानाच ओमने राहत्या घरात आपले जीवन संपवले.

काही वेळाने मामा रिक्षा घेऊन घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ओमला आवाज दिला तसेच मोबाईलवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राजू राठोड यांना संशय आला.

त्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून कडी लावलेली असल्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश करावा लागला. घरात ओमची अवस्था पाहून मामांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला.

दरम्यान, ओमने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या मृत्यूमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे बुरुंजवाडी परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू! ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले अन् काही वेळातच…

Thursday, 19 November 2026, 11:28

महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर सरकारचा मोठा निर्णय! बंद नळयोजना पुन्हा सुरू होणार; तातडीने आदेश जारी

Thursday, 19 November 2026, 11:12

सांगवीच्या पोलीस पाटलांच्या खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी

Thursday, 19 November 2026, 11:09

Loni Kalbhor News: तडीपार असूनही गावात बिनधास्त वावर; पोलिसांना पाहताच पळाला, पाठलाग करून गणेश विरकरला पकडले

Thursday, 19 November 2026, 11:01

कॉकरोच जनता पार्टीचा पुन्हा शाळांवर धडक मोर्चा! सातारा, कोल्हापूर, सांगलीत झाडाझडती मोहीम; सरकारचे टेन्शन वाढले..

Thursday, 19 November 2026, 10:49

बाळासाहेबांचा फोटो फाडला; शायना एनसींचा माफीनामा!

Thursday, 19 November 2026, 10:32
Next Post

'अक्वान' चक्रीवादळाचा रौद्रावतार! महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp