Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमविवाहानंतर छळाचा थरार! ‘तु पनौती आहेस’ म्हणत विवाहितेचा गळा दाबला; मांजरी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 May 2026, 13:33
Thrill of torture after love marriage! Married woman strangled, saying 'You are Panauti'; Manjari police station registers case against husband and four others

लोणी काळभोर, ता. 24 : प्रेमविवाह करून सासरी गेलेल्या 20 वर्षीय विवाहितेला पती, सासू-सासरे आणि दिराकडून (Pune Crime) सतत मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तु पनौती आहेस, दरिद्री आहेस” असे म्हणत शिवीगाळ, मारहाण, गळा दाबण्याचा प्रयत्न आणि चारित्र्यावर संशय घेत छळ करण्यात आल्याप्रकरणी मांजरी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

याबाबत पवित्रा चंद्रकांत कोष्ठी (वय 20, रा. तुपेनगर, गोपाळपट्टी, मांजरी बु.) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती राकेश अर्जुन पवार, सासू सुरेखा अर्जुन पवार, सासरे अर्जुन तिम्मा पवार आणि दिर सुजल अर्जुन पवार (रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती आणि राकेश पवार यांची ओळख शिक्षण घेत असताना झाली होती. त्यानंतर दोघांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी आळंदी येथे प्रेमविवाह केला. सुरुवातीला काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र, त्यानंतर पती व सासरच्यांकडून किरकोळ कारणांवरून भांडणे सुरू झाली.

फिर्यादीने पुढील शिक्षणाबाबत विचारणा केल्यानंतर पती राकेश याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला दारूचे व्यसन असल्याचे लग्नानंतर समोर आले. याबाबत विचारणा करताच तो शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सासू-सासरे आणि दिर हे देखील पतीची बाजू घेत “तुला स्वयंपाक येत नाही, घरकाम येत नाही” अशा कारणांवरून छळ करत होते. एका रात्री उशिरा झालेल्या वादात पतीने तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. तिच्या आरडाओरडीनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर ती माहेरी राहू लागली.

दरम्यान, 11 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री पती राकेश पवार हा पत्नीच्या माहेरी गेला. त्याने घरासमोर मोठमोठ्याने शिवीगाळ करत दगड मारून मोटारसायकलचे नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या हाताला चावा घेत पोट आणि पाठीवर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना बोलाविल्यानंतर हा प्रकार थांबला.

 

यानंतर आरोपींनी पुन्हा “चांगले वागवू” अशी हमी देत तिला सासरी नेले. मात्र, काही दिवसांतच पुन्हा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. पती आणि दिर हे वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. अखेर जानेवारी 2026 पासून ती माहेरी राहत आहे. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 3(5), 351(1), 352 आणि 85 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; डॉ. सोमनाथ गिते यांचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp