Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पीएमटी बसमध्ये तीन महिलांनी बॅगेतील अडीच लाखांचे मंगळसूत्र केले लंपास! लोणीकंद ते बकोरी फाटा प्रवासादरम्यान चोरी; सीसीटीव्हीत चोरी कैद

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 24 November 2026, 12:19

लोणीकंद (पुणे) : पीएमटी बसमधील गर्दीचा फायदा घेत तीन महिलांनी प्रवाशाच्या बॅगेतील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना लोणीकंद ते बकोरी फाटा बस प्रवासादरम्यान घडली. या चोरीत तब्बल 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले असून, बसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा प्रकार कैद झाला आहे.

स्वेता आल्हाद रणदिवे (वय 28, रा. सफाळे, ता. पालघर) या दिवाळीनिमित्त तळेगाव ढमढेरे येथे आपल्या आत्याकडे आल्या होत्या. गुरुवारी (ता. १९) सकाळी त्या आत्यासोबत पीएमटी बसने स्वारगेट येथे आईला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. सकाळी पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लोणीकंद बस थांब्यावर बस आली. यावेळी तीन महिला बसमध्ये चढल्या.

त्यातील एक महिला रणदिवे यांच्या सीटजवळ उभी राहिली, तर दुसरी त्यांच्या खाली ठेवलेल्या बॅगेजवळ बसली. तिसरी महिला आपले दहा रुपये पडल्याचे सांगत ते शोधत असल्याचा बनाव करू लागली. या प्रकारामुळे रणदिवे यांचे लक्ष विचलित झाले. त्यानंतर तिन्ही महिला दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बकोरी फाटा बस थांब्यावर उतरल्या.

स्वारगेट येथे आईच्या घरी पोहोचल्यानंतर रणदिवे यांच्या बॅगेची चैन उघडी असल्याचे दिसले. बॅगेतील दागिन्यांचा बॉक्स तपासला असता, त्यामधील सोन्याचे मंगळसूत्र गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, जांभळ्या रंगाची साडी नेसलेल्या महिलेने बॅगेची चैन उघडून मंगळसूत्राचा बॉक्स चोरल्याचे दिसून आले. अन्य दोन महिलांनी पैसे पडल्याचा बनाव करून चोरीस मदत केल्याचा संशय आहे.

दरम्यान, चोरीला गेलेल्या मंगळसूत्राचे वजन सुमारे 25 ग्रॅम असून, त्याची किंमत 2 लाख 50 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, बसमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तीन महिलांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Daund News : उसने दिलेले 25 हजार रुपये परत मागितल्याने घरावर दगडफेक; 13 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 24 November 2026, 12:21

पीएमटी बसमध्ये तीन महिलांनी बॅगेतील अडीच लाखांचे मंगळसूत्र केले लंपास! लोणीकंद ते बकोरी फाटा प्रवासादरम्यान चोरी; सीसीटीव्हीत चोरी कैद

Tuesday, 24 November 2026, 12:19

मुलीच्या लग्नासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याचा तगादा! वाघोलीत 22 वर्षांपासून पत्नीचा छळ; जीवे मारण्याचीही दिली धमकी

Tuesday, 24 November 2026, 12:18

वाघोलीतील प्रकल्पांना ‘खराडी’चे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल? आमदार माऊली कटके आक्रमक; जाहिरातींमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याची मागणी

Tuesday, 24 November 2026, 11:17

घरच्यांची लग्नाला संमती, साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तरीही हिंजवडीत प्रेमाचा भयानक शेवट; धक्कादायक कारण आलं समोर

Tuesday, 24 November 2026, 10:13

मुंबई-पुणे महामार्गावर AI ची नजर! खड्डे आणि अपघातप्रवण ठिकाणे शोधणार तंत्रज्ञान

Tuesday, 24 November 2026, 9:50
Next Post

Daund News : उसने दिलेले 25 हजार रुपये परत मागितल्याने घरावर दगडफेक; 13 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp