Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीतील प्रकल्पांना ‘खराडी’चे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल? आमदार माऊली कटके आक्रमक; जाहिरातींमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याची मागणी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 24 November 2026, 11:17

पुणे, ता. 24 : वाघोलीतील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये ‘खराडी एनएक्स’ आणि ‘अप्पर खराडी’ अशा नावांचा वापर करून घर खरेदीदारांची दिशाभूल केली जात असल्याचा मुद्दा आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी उपस्थित केला आहे. संबंधित विकासकांनी जाहिराती, होर्डिंग्ज आणि प्रकल्पाच्या कागदपत्रांमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करावा, तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभारले जात असून, काही विकासक सोशल मीडिया, होर्डिंग्ज आणि डिजिटल माध्यमांवरील जाहिरातींमध्ये प्रकल्पाचे मूळ ठिकाण न दर्शवता ‘खराडी एनएक्स’ किंवा ‘अप्पर खराडी’ अशा नावांचा वापर करत असल्याचे कटके यांनी निदर्शनास आणून दिले. प्रत्यक्ष प्रकल्प वाघोली परिसरात असताना जाहिरातींमधून वेगळे भौगोलिक चित्र उभे केले जात असल्याने घर खरेदीदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

घर खरेदीसाठी नागरिक लाखो-कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. त्यामुळे प्रकल्पाचे नेमके ठिकाण, पत्ता आणि प्रशासकीय हद्द यांची स्पष्ट व पारदर्शक माहिती देणे विकासकांची जबाबदारी आहे. केवळ व्यावसायिक फायदा मिळवण्यासाठी आकर्षक नावांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणे योग्य नसल्याचे कटके यांनी स्पष्ट केले.

जाहिराती आणि कागदपत्रांमध्ये वाघोलीचा स्पष्ट उल्लेख हवा
संबंधित गृहप्रकल्पांचे पिनकोड, महसूल नोंदी आणि प्रशासकीय तपशील वाघोलीशी संबंधित असताना जाहिरातींमध्ये अन्य नावांचा वापर होत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विकासकांना प्रकल्पांच्या जाहिराती, होर्डिंग्ज आणि सर्व कागदपत्रांमध्ये अधिकृत ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या विकासकांची तपासणी करून नियमांनुसार कठोर कारवाई करावी, घर खरेदीदारांची संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकरणातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, अशी मागणी आमदार माऊली कटके यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वाघोलीतील प्रकल्पांना ‘खराडी’चे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल? आमदार माऊली कटके आक्रमक; जाहिरातींमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याची मागणी

Tuesday, 24 November 2026, 11:17

घरच्यांची लग्नाला संमती, साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तरीही हिंजवडीत प्रेमाचा भयानक शेवट; धक्कादायक कारण आलं समोर

Tuesday, 24 November 2026, 10:13

मुंबई-पुणे महामार्गावर AI ची नजर! खड्डे आणि अपघातप्रवण ठिकाणे शोधणार तंत्रज्ञान

Tuesday, 24 November 2026, 9:50

पुण्यात आरटीओने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांचे आंदोलन तूर्तास स्थगित…

Tuesday, 24 November 2026, 9:06

पुण्यातील कॉस्मेटिक्स दुकानात FDA चा छापा! क्रीम आणि हेअर ऑईलसह 7.30 लाखांचा माल जप्त

Tuesday, 24 November 2026, 8:54

मुंबईकरांनो, अलिबाग आता फक्त 45 मिनिटांवर! समुद्रावर उभा राहणार 3,500 कोटींचा भव्य पूल

Tuesday, 24 November 2026, 8:47
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp