Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरच्यांची लग्नाला संमती, साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तरीही हिंजवडीत प्रेमाचा भयानक शेवट; धक्कादायक कारण आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 November 2026, 10:13

पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे गंभीर रूपांतर हत्येत झाल्याची घटना समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा तिच्याच प्रियकराने मारहाण करून जीव घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोमल राजेंद्र डहाके (वय 27, मूळ रा. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. शुभम ज्ञानेश्वर काळबांडे (वय 31) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून तोदेखील आयटी क्षेत्रात कार्यरत होता. दोघांमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचे दुसऱ्या तरुणीसोबत संबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच कारणावरून मागील 2 ते 3 महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. रविवारी रात्री दोघेही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यानंतर ते हिंजवडीतील साखरेवस्ती परिसरातील प्रिस्टाईन पीजीमध्ये आले.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. पहाटे 3 वाजेपर्यंत हा वाद वाढत गेला. याचदरम्यान शुभमने कोमलला हाताने आणि ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत तिचे डोके भिंतीवर आणि बेडवर आदळल्याने गंभीर दुखापत झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर शुभम मृतदेहाजवळच बसून होता. पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि रुग्णवाहिका मागवली. पोलिसांनी कोमलला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून शुभमला ताब्यात घेण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वाघोलीतील प्रकल्पांना ‘खराडी’चे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल? आमदार माऊली कटके आक्रमक; जाहिरातींमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याची मागणी

Tuesday, 24 November 2026, 11:17

घरच्यांची लग्नाला संमती, साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तरीही हिंजवडीत प्रेमाचा भयानक शेवट; धक्कादायक कारण आलं समोर

Tuesday, 24 November 2026, 10:13

मुंबई-पुणे महामार्गावर AI ची नजर! खड्डे आणि अपघातप्रवण ठिकाणे शोधणार तंत्रज्ञान

Tuesday, 24 November 2026, 9:50

पुण्यात आरटीओने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांचे आंदोलन तूर्तास स्थगित…

Tuesday, 24 November 2026, 9:06

पुण्यातील कॉस्मेटिक्स दुकानात FDA चा छापा! क्रीम आणि हेअर ऑईलसह 7.30 लाखांचा माल जप्त

Tuesday, 24 November 2026, 8:54

मुंबईकरांनो, अलिबाग आता फक्त 45 मिनिटांवर! समुद्रावर उभा राहणार 3,500 कोटींचा भव्य पूल

Tuesday, 24 November 2026, 8:47
Next Post

वाघोलीतील प्रकल्पांना ‘खराडी’चे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल? आमदार माऊली कटके आक्रमक; जाहिरातींमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp