Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलीच्या लग्नासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याचा तगादा! वाघोलीत 22 वर्षांपासून पत्नीचा छळ; जीवे मारण्याचीही दिली धमकी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 24 November 2026, 12:18

वाघोली, ता. 24 : मुलीच्या लग्नासाठी आणि घरखर्चासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, अन्यथा घरातून निघून जा, नाहीतर जीवे मारून टाकीन, अशी धमकी देत पत्नीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली येथे उघडकीस आला आहे. गेल्या 22 वर्षांपासून पतीकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप पत्नीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात पती लक्ष्मण पांडुरंग शिरसाट (वय 45 ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार,सन 2004 मध्ये विवाह झाल्यानंतर पतीने सुरुवातीला भारतीय सैन्यात नोकरी करत असल्याचे सांगून लग्न केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. मुलगी झाल्यानंतर पतीच्या वागण्यात बदल झाला. मुलगा हवा होता, मुलगी झाल्याने तो वारंवार टोमणे मारून शिवीगाळ करत असे. दारू पिऊन मारहाण करणे, घरखर्चासाठी पैसे मागितल्यास त्रास देणे तसेच दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून विचारणा केल्यास मारहाण करणे, असे प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शिक्रापूर येथे सन 2019 मध्ये वास्तव्यास असताना मुलांच्या भांडणातून पतीने मुलीला बेल्टच्या लोखंडी बक्कलने मारहाण केली होती. यामध्ये मुलीला चार टाके पडले होते, असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीचे लग्न ठरल्यानंतर लग्नासाठी आर्थिक मदत करण्याबाबत पतीशी चर्चा केली असता, माहेरून पैसे आणण्यास सांगून त्याने जबाबदारी झटकली. अखेर 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास पतीने दारूच्या नशेत माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न आणल्यास घरातून निघून जाण्याची धमकी देत पत्नीला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर पत्नीने वाघोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र नोंद केली होती. त्यानंतर पती घरातील वाहन, शिक्रापूर येथील प्लॉट व शेतीसंबंधी कागदपत्रे घेऊन निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे पत्नी व मुलांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही तिने म्हटले आहे. या प्रकरणी पतीविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daund News : उसने दिलेले 25 हजार रुपये परत मागितल्याने घरावर दगडफेक; 13 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 24 November 2026, 12:21

पीएमटी बसमध्ये तीन महिलांनी बॅगेतील अडीच लाखांचे मंगळसूत्र केले लंपास! लोणीकंद ते बकोरी फाटा प्रवासादरम्यान चोरी; सीसीटीव्हीत चोरी कैद

Tuesday, 24 November 2026, 12:19

मुलीच्या लग्नासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याचा तगादा! वाघोलीत 22 वर्षांपासून पत्नीचा छळ; जीवे मारण्याचीही दिली धमकी

Tuesday, 24 November 2026, 12:18

वाघोलीतील प्रकल्पांना ‘खराडी’चे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल? आमदार माऊली कटके आक्रमक; जाहिरातींमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याची मागणी

Tuesday, 24 November 2026, 11:17

घरच्यांची लग्नाला संमती, साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तरीही हिंजवडीत प्रेमाचा भयानक शेवट; धक्कादायक कारण आलं समोर

Tuesday, 24 November 2026, 10:13

मुंबई-पुणे महामार्गावर AI ची नजर! खड्डे आणि अपघातप्रवण ठिकाणे शोधणार तंत्रज्ञान

Tuesday, 24 November 2026, 9:50
Next Post

पीएमटी बसमध्ये तीन महिलांनी बॅगेतील अडीच लाखांचे मंगळसूत्र केले लंपास! लोणीकंद ते बकोरी फाटा प्रवासादरम्यान चोरी; सीसीटीव्हीत चोरी कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp