लोणी काळभोर, ता. 21: भारतीय जनता पार्टीने लोणी काळभोर-कदमवाकवस्ती-वडकी जिल्हा परिषद गट आणि लोणी काळभोर व कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. लोणी काळभोर गटातून पूनम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. लोणी काळभोर पंचायत समिती गणातून श्वेता कमलेश काळभोर तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून ज्ञानेश्वर नामुगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या अगोदरच लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी शीतल कांबळे, लोणी काळभोर पंचायत समिती गणातून रेश्मा काळभोर, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून अमोल टेकाळे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने या गटातील अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे. त्यामुळे या गटात खरी लढत या दोन्ही पक्षांमध्ये होणार आहे.

आघाडी होण्याची दाट शक्यात?
राष्ट्रवादीने तिकीट कापल्यानंतर नाराज झालेल्या उमेदवार अनीता गवळी, भिसे व हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर यांच्या वतीने एक उमेदवार असे मिळून आघाडी करणार आहेत. अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. परंतु, लोणी काळभोर जिल्हा परिषद गटाची निवडणूक दुरंगी, तिरंगी की बहुरंगी होईल? याचे अंतिम चित्र काही तासातच स्पष्ट होणार आहे.








