Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेना कोणाची? पक्ष अन् चिन्हाच्या सुनावणीला पुन्हा ब्रेक; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 September 2026, 16:49

पुणे : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हासंदर्भात सुरू असलेली सुनावणी आज अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणात 17 सप्टेंबर रोजी न्यायालयात शेवटचा युक्तिवाद झाला होता, ज्यानंतर न्यायालयाने 22 सप्टेंबर ही पुढील तारीख निश्चित केली होती. मात्र आता या सुनावणीला पुन्हा ब्रेक लागला असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

आजच्या वेळापत्रकानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने वरिष्ठ वकील नीरज किशन कौल आपले मांडणी सादर करणार होते. मात्र, आज ही प्रस्तावित सुनावणी होऊ शकली नाही. सुप्रीम कोर्टाच्या या घडामोडीनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी न्यायालयाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षाचे सर्व युक्तिवाद आम्ही आत्तापर्यंतच्या प्रक्रियेत पूर्णपणे खोडून काढले आहेत, असा दावा त्यांनी केला.

राजू वाघमारे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून त्यांना कायदेशीर निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. नियमांनुसार योग्य त्या सर्व मार्गांचा वापर करूनच आयोगाने शिंदे गटाला अधिकृत पक्ष आणि चिन्ह बहाल केले आहे. नीरज कौल यांनी मागील सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर या कायद्याची आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांची योग्य ती मांडणी केली होती.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना वाघमारे म्हणाले की, “आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने वाट पाहायला हवी होती, असा कोणताही कडक नियम किंवा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे विरोधकांचा हा दावा पूर्णपणे चुकीचा ठरतो. विरोधी गट आता सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सचा आधार घेऊन जनतेत खोटा प्रचार आणि चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र, जनता आता सतर्क झाली असून सत्य काय आहे हे सर्वांना समजले आहे.”असत्य हे फक्त काही काळापुरतेच टिकू शकते, मात्र कायदा नेहमी सत्याच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असा ठाम विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर झालेल्या साखळी अपघातानंतर UAE मध्येही 23 वाहनांची धडक; 14 जणांचा मृत्यू, 38 जखमी

Monday, 16 November 2026, 9:33

तळेगावच्या बंद कारखान्याला मिळणार नवसंजीवनी! अमित शाहांकडून 1,500 कोटींची घोषणा

Monday, 16 November 2026, 9:10

राज्यात दुष्काळ, मॅरेथॉनवर 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल

Monday, 16 November 2026, 8:51

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची निर्घृण हत्या? वैनगंगा नदीकाठी आढळल्या रक्ताच्या थारोळ्यात

Monday, 16 November 2026, 8:34

राज्यात हुडहुडी, पारा आणखी घसरणार! धुळे १०.४ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढण्याचे संकेत

Monday, 16 November 2026, 8:25

नोव्हेंबरच्या मध्यात हवामानाचा नवा बदल! सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; पुढील काही दिवस कसे असणार वातावरण? वाचा

Monday, 16 November 2026, 8:00
Next Post

प्रवाशांसाठी महा-खूशखबर! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट; ताशी १६० किमी वेगाने धावणार गाड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp