Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये चोरट्यांचा दुचाकींवर डल्ला! शिक्षकाची बाइक अन् चालकाची ई-स्कूटर लंपास

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 12 October 2026, 10:34

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र सुरूच असून परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि एक मोटारसायकल चोरीला गेली आहे. जयमल्हार रोडवरील ओढ्याजवळून चालकाची ई-स्कूटर, तर बी. जी. शिर्के विद्यालयाच्या पार्किंगमधून शिक्षकाची मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. या दोन्ही घटनांमध्ये एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, उरुळी कांचन पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत सोरतापवाडी येथील कडवस्ती रोडवर राहणारे बाळासाहेब लक्ष्मण चौधरी (वय-51) हे शाळेच्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. दैनंदिन कामासाठी ते टीव्हीएस कंपनीची पांढऱ्या रंगाची इलेक्ट्रिक स्कूटर वापरतात. रविवारी (ता.4) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी आपली स्कूटर उरुळी कांचन येथील जयमल्हार रोडवरील ओढ्याजवळ उभी केली आणि बाजारात गेले.

सायंकाळी सव्वासहा वाजता बाजार करून परतल्यानंतर त्यांना पार्किंगच्या ठिकाणी स्कूटर दिसली नाही. त्यांनी परिसरात तसेच उरुळी कांचन, कोरेगाव मूळ आणि सोरतापवाडी येथे शोध घेतला; मात्र स्कूटर मिळून आली नाही. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. सुमारे 70 हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर चोरीला गेल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत दौंड तालुक्यातील वाळकी येथील रहिवासी स्वप्निल बाळासो भालेराव (वय-39) हे उरुळी कांचन येथील बी. जी. शिर्के विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी (ता. 08) सकाळी दहाच्या सुमारास ते हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल घेऊन शाळेत आले. त्यांनी मोटारसायकल शाळेच्या पार्किंगमध्ये उभी केली आणि वर्गावर गेले.

 

दुपारी दोनच्या सुमारास कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी ते पार्किंगमध्ये आले असता, त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही दुचाकी न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, दोन्ही घटनांमध्ये उरुळी कांचन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2)अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उरुळी कांचन पोलिसांकडून या दोन्ही चोरीच्या घटनांचा पुढील तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात चिमुकल्या श्वानासोबत रिक्षाचालकाचं क्रूर कृत्य! बेल्टने मारलं, भिंतीवर आपटलं नंतर चौथ्या मजल्यावरून खाली फेकत…

Tuesday, 13 October 2026, 19:29

दिल्लीच्या राजकारणात भूकंप! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरफार होण्याच्या चर्चा; केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा…

Tuesday, 13 October 2026, 19:19

शेतकऱ्यांनो आता उत्पन्न डबल होणार! शेतकरी उत्पन्न वाढीसाठी सरकारचा नवा ‘मास्टरप्लॅन’; जाणून घ्या सविस्तर…

Tuesday, 13 October 2026, 19:03

‘Old Monk’ बंदीचा फटका सरकारच्या तिजोरीला! सरकारचे कोट्यवधी रुपये बुडाले; कंपनीला ५०० कोटींचं नुकसान

Tuesday, 13 October 2026, 18:57

पुणेकरांनो बाहेरचं खाताय? तर जरा जपून! पुण्यातल्या फेमस ‘गार्डन वडापाव’सह ४ हॉटेल्सवर FDAची धाड; लाखोंचं खाद्यतेल जप्त

Tuesday, 13 October 2026, 18:51

शिवसेना पक्ष, चिन्ह कोणाला मिळणार? निकाल कधी लागणार? असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं; डेडलाईन सांगत….

Tuesday, 13 October 2026, 17:56
Next Post

सोरतापवाडीतील 15 वर्षीय, तर तुपेवस्तीतील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता; उरुळी कांचन पोलिसांकडून तपास सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp