भोर : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी कंबर कसली आहे.
या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येणारे सर्वच तालुक्यांमध्ये जात आहेत. नुकतीच अजित पवारांची भोर इथे सभा झाली आहे.
या सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी मी येथे MIDC आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जर मी हे आश्वासन पूर्ण करु शकलो नाही तर मी पुन्हा या लोकसभा मतदार संघात माझा उमेदवार देणार नाही.
यावेळी अजित दादांनी बोलताना सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. बारामतीत मी केलेली कामे स्वत: केली असल्याचेच सध्याचे खासदार सांगत आहेत. येथील सर्व शासकीय इमारती मी बांधल्या आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तकात या कामाचे फोटो टाकलेले आहेत. प्रत्येकवेळी नुसती भाषणे देऊन लोकांची कामं होत नाहीत. फक्त भाषणे न करता त्याला कामाचीही जोड असायला हवी. ही कामे होण्यासाठी प्रशासनावर तुमची पकड ही पाहिजे., असही अजित पवार बोलतना म्हणाले.