चाकण (पुणे); आंबेठाण (ता.खेड ) या गावातील मराठी शाळेजवळील पाण्याच्या टाकीवर चढून एका मनोरुग्ण तरुणाने उडी मारली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. विनोद विजय गुळवे (वय.२४ वर्षे ) असं या तरुणाच नाव आहे. टाकीवर चढून उडी घेतल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस आणि रेशक्यू टीमने तब्बल ४ तास अथक प्रयत्न करूनही तरुणांला खाली उतरविण्यात त्यांना यश आलं नाही.
दरम्यान, हा तरुण सलग २ दिवस याच पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पहिल्या दिवशी रेशक्यू टीमने आणि महाळुंगे एमआयडीसी(MIDC) पोलिसांनी सीताफिने खाली उतरवले होते. मात्र, २६ जानेवारी रोजी हा तरुण सकाळी ११ वाजल्यापासून टाकीवर चढून उडी मारण्याची भीती दाखवत होता. त्याला वाचविण्यासाठी त्याचे कुटुंब, पोलीस प्रशासन, रेशक्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थ विनवण्या करत होते. पण तो कोणालाही दाद देत नव्हता.
अखेर पोलीस व रेशक्यू टीमने पाण्याच्या टाकीला जाळी लावून त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याने एका रेस्क्यू टीमच्या ताब्यातून सुटून थेट टाकीवरून खाली उडी घेतली. त्यावेळी उपस्थित नागरिक खाबारले होते. जखमी तरुणांस उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.