बापूसाहेब मुळीक
पुरंदर : चांबळी ता. पुरंदर येथील कडजाई बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभ हा उन्हाळ्यातच गावकऱ्यांच्या सहभागातून व सामाजिक संस्थेतून करण्यात आला होता. कडजाई बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे खोलीकरणाचे काम करण्यात आले. जुलै महिन्याच्या अखेरीस 80% हा बंधारा भरला असताना आज अखेर 100% भरल्यामुळे नारळ, ओटी भरून महिला सरपंच ज्योती कदम व भारती कामठे याच्याकडून बंधाऱ्यातील पाण्याचे जलपुजन करण्यात आले. शंभर टक्के बंधारा भरल्यामुळे पिण्याचे पाणी व शेती यासाठी याचा नक्कीच चांगला फायदा होणार असल्याचे माजी उपसरपंच संजय कामठे यांनी सांगितले.
हा गाळ उन्हाळ्यात काढल्यामुळे बंधाऱ्याखालील असणाऱ्या 55 विहिरींना याचा फायदा होऊन साधारणपणे 120 एकर क्षेत्र हे ओलिताखाली येणार असल्याचे विद्यमान सरपंच ज्योती कदम यांनी सांगितले. यावेळी विद्यमान सरपंच ज्योती कदम, माजी उपसरपंच संजय कामठे, मारुती कामठे ,संदीप कदम, गणेश शेंडकर ,भारती कामठे संदीप कामठे, ज्ञानेश्वरी कामठे ,ज्ञानेश्वर कामठे, पत्रकार आदी उपस्थित होते.