Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नव्या कारचा आनंद क्षणात संपला! पुण्यात कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 13 November 2026, 8:49

पुणे: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन कार खरेदी करण्याचा आनंद काही क्षणांतच दुःखात बदलला. नव्या कारमधून फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या तिघांवर काळाने घाला घातला. सासवड-हडपसर सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील 2 जणांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

संजय वसंत मोडक (वय 49) आणि अविनाश बाळासाहेब अर्णे (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. तर सुनील दिगंबर मोडक (वय 39) हे या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातानंतर सुनील यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

नेमका अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघांनी नवीन कार खरेदी केली होती. त्यानंतर नव्या गाडीतून फेरफटका मारण्यासाठी ते बाहेर पडले. सुनील मोडक हे कार चालवत होते. त्यांच्यासोबत संजय मोडक आणि अविनाश अर्णे हे देखील होते. तिघेही सासवड-हडपसर सेवा रस्त्याने हडपसरच्या दिशेने जात होते.

याचवेळी रस्त्यावर एका ठिकाणी कंटेनर उभा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या सेवा रस्त्यावर वाहन पार्क करण्यास परवानगी नसतानाही कंटेनर चालकाने तिथे गाडी उभी केली होती. त्यातच रात्रीच्या वेळी कंटेनरचे पार्किंग दिवेही सुरू नव्हते. त्यामुळे अंधारात उभा असलेला कंटेनर कारचालकाच्या लक्षात आला नाही आणि कार थेट त्याला धडकली.

धडक इतकी जोरदार होती की संजय मोडक आणि अविनाश अर्णे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. फुरसुंगी पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

फटाके बाजूला उडवण्यास सांगितल्याचा राग! टोळक्याच्या बेदम मारहाणीत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Friday, 13 November 2026, 17:37

सरकारी पगार घेऊनही रेशनच्या धान्याचा लाभ ! 1.82 लाख कर्मचाऱ्यांची होणार चौकशी; सरकारचा मोठा निर्णय..

Friday, 13 November 2026, 17:15

शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी करत सुरू होता काळ्या जादूचा खेळ; गावकऱ्यांच्या सतर्कतेने भोंदूबाबाचा भांडाफोड

Friday, 13 November 2026, 16:54

महसूल मंत्र्यांच्या आदेशाला पुरंदरमध्ये केराची टोपली! सामायिक जमिनीच्या खरेदीखतावरून महसूल विभागात खळबळ

Friday, 13 November 2026, 16:41

अष्टापुरात लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरफोडी! सोन्याचे दागिने, रोकड आणि नवी अ‍ॅक्टिव्हा लंपास, कारची चावीही पळवली

Friday, 13 November 2026, 16:29

पुण्यात पोलिसांवरच जीवघेणा हल्ला! दारूच्या नशेत तर्रार असलेल्या दोघांनी पोलीस उपनिरीक्षकाशी केली झटापट

Friday, 13 November 2026, 16:26
Next Post

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये CNG आणि PNG महागले; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp