दौंड : रमामाई मुक्ती मिशन केडगाव, (ता. दौंड, पुणे) येथे अनुसूचित जातीच्या खाटिक समाजातील दोन अल्पवयीन हिंदू मुलींना दौंड, येथे परदेशी निधीद्वारे, पंडित रमाबाई मुक्ती मिशन या ख्रिश्चन संस्थेत सामील होण्यास सक्ती केल्याचे व धर्मांत्तरासाठीचे आमिष दाखवण्यात आल्याची अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. आमदार उमा खापरे यांनी सभागृहात या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. या प्रकरणाबाबत उत्तर देताना गृहमंत्र्यांनी एका वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांच्याकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.
रमामाई मुक्ती मिशन केडगाव, (ता. दौंड, पुणे) येथे अनुसूचित जातीच्या खाटिक समाजातील दोन अल्पवयीन हिंदू मुलींना दौंड, येथे परदेशी निधीद्वारे समर्थित पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या खिश्चन संस्थेत सामील होण्यास सक्ती केल्याची अत्यंत गंभीरबाब निदर्शनास आली आहे. संबंधित मुलीच्या आईचा कोविड मुळे मृत्यू झाल्यामुळे मुलीच्या मावशीने सदर मुलींना रमाबाई मुक्ती मिशनमध्ये सामील होण्यासाठी संध्या वासवे नामक महिलेच्या प्रभावाखाली भाग पाडले. तसेच पुढे धर्मांतर करण्यासाठी मुलींच्या पालकांना मोठे आर्थिक आमिष दाखविले. मुलींना मिशनच्या वसतिगृहात गैरवर्तनाला सामोरे जावे लागत असल्याचीबाब सुद्धा निदर्शनास आली होती. त्यामध्ये त्यांच्यावर शारीरिक, मानसिक अत्याचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
परदेशी नागरीक आल्यावर त्यांच्यासोबत, फाटलेले कपडे आणि वेडेवाकडे केस कापून असलेल्या अवस्थेत फोटो काढण्यास भाग पाडले जात होते. तसेच विद्यार्थिनींना हिंदू देवतांची पूजा करू दिली जात नव्हती. याबाबत भारतीय मानवाधिकार परिषदेने अभ्यास करून तयार केलेला अहवाल पोलिसांना सुपूर्द केला होता. पुणे शिवाजीनगर पो. स्टेशन मध्ये दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु सदर तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनात आले आहे.
सदर गंभीर बाबीकडे अद्यापर्यंत गांभीर्याने न पाहिल्यामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष पसारला आहे. याबाबत आमदार उमाताई खापरे यांनी सभागृहात हा विषय उचलून धरला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांनी एका वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांच्याकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.