Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१९ जणांचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे; ९ पोलीस आणि १३ उत्पादन शुल्क अधिकारी निलंबित, पण मृत्यूंसाठी जबाबदार कोण?

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 May 2026, 13:06

पुणे, ता. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आता १९ वर पोहोचला असून अनेक जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध हातभट्टी आणि गावठी दारूच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला असला, तरी “१९ निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन का जागे झाले?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी एकूण ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी यांच्यासह दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, उपनिरीक्षक राजू भास्कर, कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

दुसरीकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागालाही या प्रकरणात मोठा फटका बसला असून १३ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामध्ये ३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अवैध दारूचा व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू असताना संबंधित विभाग झोपेत होता का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अनेक नागरिकांनी गावठी दारूचे सेवन केल्यानंतर त्यांना डोळ्यांची जळजळ, चक्कर येणे, अंधारी येणे, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे आणि तोंडातून फेस येणे अशी गंभीर लक्षणे दिसू लागली. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र काहींना उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यूने गाठले. फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात झालेल्या या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावले गेले असून काही घरांमध्ये कमावती व्यक्ती गमावल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या मृत्यूंमुळे परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) बुधवारी बाबा शेख (वय ४५) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी राजेश शांताराम राजपूत (वय ५०), अकबर अझीमखान पठाण (वय ४८), आनंद पांडुरंग देसाई (वय ५३), आनंद काशिनाथ निकाळजे (वय ६४), पांडुरंग सखाराम फुगे (वय ५३), विजय प्रकाश राठोड (वय ३१) आणि राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी अक्षय अशोक अवसरमल (वय २८), सचिन रामचंद्र नेटके (वय ३६), भीमण्णा बसन्ना नागराल (वय २७), सुरप्पा मनप्पा बंगारी (वय ५५) आणि कबीर अब्दुल शहा (वय ४५, रा. फुगेवाडी) यांचा मृत्यू झाला.

हडपसर परिसरात अरुण वामन डाडर (वय ६०), यशवंत रघुनाथ पवार (वय ६४), दत्ता माधवराव सूर्यवंशी (वय ५५) आणि अशोक रमेश चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर विजय भुकूरलाल शर्मा (वय ४५) आणि प्रवीण जाधव (वय ५२) यांचाही विषारी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे पोलीस आणि दापोडी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह ८ ते १० जणांना अटक केली आहे.

प्राथमिक तपासात मिथेनॉल मिसळून गावठी दारू तयार करून तिची विक्री केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह १० जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, केवळ दारू विक्रेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून चालणार नाही. या अवैध व्यवसायाला संरक्षण देणारे, त्याकडे दुर्लक्ष करणारे आणि हप्तेखोरीच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात आलेले अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

राज्यात हातभट्टी दारूवर बंदी असतानाही गावोगावी आणि शहरांमध्ये तिची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचे आरोप आहेत. त्यामुळे केवळ निलंबन करून प्रकरणावर पडदा टाकण्याऐवजी दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, १९ जणांचे प्राण गेल्यानंतर झालेली कारवाई पुरेशी आहे का? की या मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या संपूर्ण साखळीला कायद्याच्या कठघऱ्यात उभे केले जाणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ समितीसाठी हवेलीतील 5 प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड; अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांचा निर्णय..

Sunday, 21 June 2026, 15:34

बंड केलं कारण शिवसेनेत राहून…; मौन सोडत खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी स्पष्टच सांगितलं कि…

Sunday, 21 June 2026, 15:29

मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त ठरला! पावसाची प्रतीक्षा संपली; मान्सून ‘या’ दिवसापासून पुन्हा सक्रिय

Sunday, 21 June 2026, 15:12

सोने स्वस्त झाले! सोन्याचे दर 1.80 वरून 1.47 लाखांवर; गुंतवणुकीसाठी हीच का योग्य वेळ? जाणून घ्या

Sunday, 21 June 2026, 15:02

पुणेकरांसाठी गुड न्यूज! पीएमआरडीए-महारेल कराराने रेल्वेफाटकमुक्त होणार रस्ते; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

Sunday, 21 June 2026, 14:56

एकतर्फी प्रेमाचा नको असलेला ‘द एंड’! तरुणीने नकार दिला म्हणून तिच्या पतीची केली हत्या; भररस्त्यात घडलं भयंकर

Sunday, 21 June 2026, 14:21
Next Post

भोंदू मनोहर मामाला नेत्यांचा आशीर्वाद? राजकीय धागेदोरे आले समोर; आमदाराच्या पीएला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.