अरुण भोई
भिगवण : स्वामी विवेकानंद असोसिएशन गणपती मंडळाच्या वतीने समाजामधील सामाजिक समाज हित काम करणाऱ्या लोकांचा मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाच्या निमित्ताने सन्मान व सत्कार समारंभ उपक्रम केला जात आहेत. समाजामध्ये जो काम करतो तोच चुकत, जो काम करत नाही त्याचा चुकण्याचा काहीच संबंध येत नाही, त्यामुळे आमच्याही कामाचं कधीतरी कौतुक करा आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. मदनवाडी भिगवण येथे स्वामी विवेकानंद असोसिएशन गणपती मंडळ येथे पत्रकार आणि पोलीस बांधव यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
या ठिकाणी अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मंहागडे आणि त्यांचे कर्मचारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले की मी साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी इंदापूर तालुक्यासाठी आणला. त्यातून अनेक विकासकामे पूर्ण केल्याचे मला समाधान आहे. स्वामी विवेकानंद असोसिएशन गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना या स्तुत्य कार्यक्रमाबद्दल पुढील कार्यासाठी आमदार भरणे यांनी शुभेच्छा दिल्या.
या ठिकाणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पत्रकार आणि पोलीस यांचा फेटा, प्रशस्तीपत्र, आणि रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी धनंजय थोरात, दादासाहेब ठोंबरे पोलीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, धनंजय थोरात, दादासाहेब ठोंबरे, ज्येष्ठ पत्रकार चितळकर सर, दादासाहेब थोरात, भरत मल्लाव, डॉ सोलनकर सर, डॉ. चवरे सर व सर्व पत्रकार, मदनवाडीचे नानासाहेब बडगर, तुकाराम बंडगर, इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.