पळसदेव (पुणे) : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय रंगोत्सव आणि समृध्दी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
नशिकच्या देवळाली हायस्कूलच्या सविता लवेरी,आरती ठोके यांनी समृद्धी कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळविला. परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपसंचालक डॉ. आय. पी नदाफ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेश बनकर,टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. माधुरी इसावे , कला क्रीडा विभागाचे विषय विभागप्रमुख सचिन चव्हाण,अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे, संगीत शिक्षिका पद्मजा लामरुड आदी मान्यवर उपस्थित होते. अनुभवात्मक शिक्षणावर आधारित अध्ययन अध्यापन पद्धतीचा प्रसार व प्रचार व्हावा या हेतूने रंगोत्सव व समृध्दी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी कला एकात्मिक अध्ययन, क्रीडा एकात्मिक अध्ययन, खेळणी यांच्या आधारे अध्ययन, कथाकथन यांच्या माध्यमातून अध्ययन या विषयावर सादरीकरण करण्यात आले. रंगोत्सव कार्यक्रमात 192 विदयार्थी आणि 23 प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते. तर समृद्धी कार्यक्रमात 16 माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते.
जिल्हास्तरावर रंगोत्सव आणि समृद्धी कार्यक्रमाचे परीक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी यांनी केले तर विभाग स्तरावर प्रादेशिक विद्या प्राधिकरण येथील अधिकारी यांनी परीक्षण केले..
समृद्धी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक:
सौ.सविता भारत लवेरी
सौ. आरती यशवंत ठोके
देवळाली हायस्कूल, देवळाली कॅम्प, जिल्हा नाशिक
द्वितीय क्रमांक:
श्रीमती सारीका धन्यकुमार जैन ,जिल्हा परिषद प्रशाला,लाडसावंगी
ता.जिल्हा छ.संभाजीनगर
तृतीय क्रमांक:
श्री. संजय शहाजी कांबळे
श्री. संजय कल्लाप्पा सुतार
लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर, तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर