Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 July 2026, 10:45

लोणी काळभोर, ता. २८ : सोलापूर जनता सहकारी बँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 4 कोटींच्या कर्जप्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने सील करून बँकेच्या ताब्यात देण्यात आलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून अनधिकृतपणे पुन्हा ताबा घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कर्जदार, त्याची पत्नी, वडील, आई तसेच इतर संबंधितांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय पांडुरंग जवळकर, त्यांची पत्नी वर्षा जवळकर, पांडुरंग लक्ष्मण जवळकर, सुभद्रा पांडुरंग जवळकर (सर्व. रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) याबाबत सोलापूर जनता सहकारी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेतील ज्युनियर ऑफिसर नितीन मुरलीधर अंबुरे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील पांडुरंग जवळकर यांच्या मालकीची तारण ठेवलेली मालमत्ता बँकेकडे गहाण होती. या मालमत्तेच्या आधारे दत्तात्रय जवळकर यांनी २९ ऑक्टोबर २०१५ रोजी खेळते भांडवलासाठी 4 कोटींचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला काही हप्ते भरल्यानंतर कर्जदाराने परतफेड थांबविल्याने बँकेने वारंवार नोटिसा, फोन तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठपुरावा केला. मात्र, त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

सततच्या थकबाकीमुळे संबंधित कर्ज खाते ३१ ऑगस्ट २०१७ रोजी एनपीए (अनुत्पादित कर्ज) म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतरही बँकेने कर्ज फेडण्याची संधी दिली. मात्र थकबाकी न भरल्याने सरफेसी कायदा, २००२ अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार १२ मार्च २०२६ रोजी न्यायालय नियुक्त कोर्ट कमिशनर अॅड. विजय कोंढाळकर यांनी पोलीस बंदोबस्तात संबंधित मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला. मालमत्तेला कुलूप लावून सील करण्यात आले तसेच ताबा नोटीस लावून संपूर्ण मालमत्ता बँकेच्या ताब्यात देण्यात आली.

 

मात्र, ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी बँकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता, न्यायालयाच्या आदेशाने लावलेले कुलूप, कडी-कोयंडा आणि सील तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच ताबा नोटीस काढून टाकून कर्जदार दत्तात्रय पांडुरंग जवळकर, त्यांची पत्नी वर्षा जवळकर, पांडुरंग लक्ष्मण जवळकर, सुभद्रा पांडुरंग जवळकर आणि इतरांनी संबंधित मालमत्तेत बेकायदेशीररित्या प्रवेश करून पुन्हा कब्जा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याबरोबरच बँकेच्या ताब्यातील मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी संबंधित चौघांसह इतरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp