यवत : केडगाव येथील श्रध्दा दळवी आणि द्रिषा कुंजीर यांनी गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल बँडी स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. पणजी ( गोवा) येथील गव्हर्नमेंट युथ हॉस्टेल मिरामार येथे स्केटिंग हॉकी ही स्पर्धा नुकतीच झाली आहे.
या स्पर्धेसाठी पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू यांसह 10 राज्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते तर दौंड तालुक्यातील केडगाव – चौफुला येथील ग्रेट स्पोर्टस् अकॅडमीचे स्पर्धक देखील सहभागी झाले होते. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल ऑफ जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नायगाव येथील शिक्षिका राजश्री दळवी यांची कन्या श्रद्धा दळवी हे देखील सहभागी झाली होती.
गोवा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना श्रद्धा सोमनाथ दळवी व द्रिषा रोहन कुंजीर यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकाविले. चैतन्य कलीचरण शितोळे याने रौप्य पदक तर आर्यन कुंभार, दिग्विजय दिवेकर यांनी कांस्यपदक पटकाविले. यावेळी राजवीर दळवी, रुद्रांश लोखंडे, ओम तांबे, अंश यादव, क्षितिज कुंभार, ओजेस शेळके, ओम पवार यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
नॅशनल बँडी स्केटिंग ( स्केटिंग हॉकी) हा खेळ जागतिक पातळीवर खेळला जात असून यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलांची प्रगती दैदीप्यमान असून या विद्यार्थ्यांना समाधान दाने, गणेश घुगे, आकाश कसबे व यश बारवकर यांचे मार्गदर्शन लाभले. परराज्यात जाऊन श्रद्धा दळवी व द्रिषा कुंजीर यांनी आपल्यातील असलेल्या कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्राचे व केडगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले आहे.
ही कामगिरी केल्याबद्दल श्रद्धा दळवी व द्रिषा कुंजीर या सुवर्णकन्यांचे व सहभागी स्पर्धकांचे केडगाव येथील शिक्षक शरद पवार, विजय तीपुडगे, डॉ. लोणकर, संदीप टेंगले, सामाजिक कार्यकर्ते धनराज मासाळ यांसह चौफुला व केडगाव परिसरातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.