लोणी काळभोर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून महिलेला शिवीगाळ करून स्टीलच्या पाईपने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गणपती चौकातील एका लेडीज शॉपीमध्ये गुरुवारी (ता.28) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी स्वप्नील काळभोर (वय-22, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी वैशाली संजय पाटील (वय 39, कन्या शाळेजवळ, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली पाटील व लक्ष्मी काळभोर या दोघींची लोणी काळभोर येथील गणपती चौकात लेडीज शॉपीचे दुकाने आहेत. या दोघींची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून लक्ष्मी काळभोर या फिर्यादी यांच्या दुकानात गेल्या. आणि काळभोर यांनी फिर्यादी पाटील यांना तु कशी दुकान चालु ठेवते? ते मी बघते? अशा म्हणाल्या.
त्यानंतर काळभोर यांनी फिर्यादी पाटील यांना शिवीगाळ करून प्लॉस्टीकच्या बकेटमधील मिरचीचे पाणी अंगावर फेकले. त्यामुळे पाटील यांच्या डोळयात आग होवु लागल्याने त्यांनी डोळे बंद केले. तेव्हा काळभोर यांनी दुकानातील स्टीलचे पाईपने फिर्यादी पाटील यांच्या हातावर व डोक्यावर मारुन त्यांना जखमी केले आहे. तसेच दुकानातील मालाचे व साहित्याचे नुकसान करण्यात आले आहे.
याप्रकरणी वैशाली पाटील यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मी काळभोर यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड सहिता कमल 131, 118 (1),352.351 (2), 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.