इंदापूर : तालुक्यातील काटी व कालठण नं. 2 येथे इंदापूर आगाराकडून एसटी बसेस सोडल्या जातात. परंतु त्यांचे वेळापत्रक अनियमित असल्याने विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे वरील ठिकाणच्या एसटी बसेसचे वेळापत्रक नियमित करावे अशी मागणी जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना शिंदे गट पुणे जिल्हा वतीने निवेदनाद्वारे इंदापूर आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील काटी व कालठण येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थी हे या गावात सकाळी लवकर बस असल्याने ज्या विद्यार्थ्यांनीना दुपारी 12 वाजता शाळा व महाविद्यालये आहेत. त्यांना पुन्हा गाडी नसल्याने दोन तास आधीच इंदापूर येथे यावं लागतं. काॅलेज व बसस्थानक परिसरात शाळेच्या वेळेपर्यंत खोळंबत राहावे लागते. काही विपरीत प्रसंगानाही सामोरे जावे लागते संध्याकाळी ही बस परत गावाकडे जाताना फिक्स टायमिंग नसतो. तो सायंकाळी 5.30 चा करावा जेणेकरून सर्व जण वेळेस व सुरक्षित घरी पोहोचतील अशी मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी बोलताना आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी म्हणाले, मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले. यावेळी पुणे जिल्हा महिला प्रमुख सीमाताई कल्याणकर, तालुकाप्रमुख रामचंद्र जामदार, तालुका संघटक अशोक देवकर, निर्मला जाधव, राधिका जगताप उपस्थित आदी उपस्थित होते.