Shirur News : कवठे येमाई, (पुणे) : ओढ्याचे खोलीकरण केल्याने नैसर्गिक जलस्त्रोत बळकट होणार आहेत. पाण्याच्या भूगर्भ पातळीत वाढ होईल. त्यातून शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. असे मत पंचायत समितीचे माजी सदस्य सुदाम इचके यांनी व्यक्त केले.
ओढा खोलीकरण कामाचा लोकार्पण सोहळा
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे बुरखार्ट कॉम्प्रेशन कंपनीचा सी एसआर फंड व लोकसहभागातून शुक्रवारी (ता. ०६) खारओढा येथे पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत ओढा खोलीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
याप्रसंगी कंपनी मार्फत वृक्षारोपण करण्यात आलेमाजी पंचायत समिती सदस्य सुदाम ईचके, बुरखार्ट कंपनीचे फायनान्स व्यवस्थापक प्रसाद भिडे, व्यवस्थापक रवींद्र शेलार, रामदास सांडभोर, माजी सरपंच दीपक रत्नपारखी, माजी सोसायटी चेअरमन बबन पोकळे, बाळासाहेब डांगे, मारुती इचके, निलेश पोकळे, सोपान वागदरे, मारुती इचके, सुनील पोकळे, रामदास इचके, एस क्लब अध्यक्ष नवनाथ सांडभोर, उपाध्यक्ष संतोष उंचाळे, सचिव संजय चौधरी, प्रकाश इचके, माजी सरपंच अमोल घोडे, माजी उपसरपंच संदीप वागदरे आदी उपस्थित होते.