Shirur News : टाकळी हाजी : समाजात जसा वाईटपणा आहे, तसा चांगुलपणाही आहे. असत्याचे पावलोपावली दर्शन घडत असले, तरी कोठे ना कोठे सत्याची कास धरून चालणारेही आढळतात. अशुभ घटनांचा सुकाळ दिसत असला, तरी शुभाचा दुष्काळ आहे. असेही म्हणता येणार नाही. असेच एक हात मदतीचा म्हणून सहकारी मित्रांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. (Shirur News)
मदतनिधी म्हणून ७१ हजार रुपयाचा धनादेश…
शिरूर येथील मोटार वायडिंग व्यावसायिक विष्णू गायकवाड यांचे काही दिवसापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले होते. घरची परिस्थिती नाजूक असून घरातील कमावती व्यक्ती मृत झाल्याने पत्नी व दोन मुले यांना उपजिविकेसाठी काहीही साधन नाही. त्यामुळे तालुक्यातील इलेक्ट्रिक मोटर वायडिंग संस्था शिरूर या संघटनेकडून त्यांच्या परिवारासाठी मदतनिधी म्हणून ७१ हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. (Shirur News)
यावेळी संघटनेचे अध्यक्ष विकास खैरे, उपाध्यक्ष राकेश शिंदे,सचिव विष्णू गोरडे, खजिनदार संजय खेतमाळीस, संपर्क प्रमुख प्रताप जाधव, अशोक औटी, सचिन कोल्हे, संतोष रासकर , चंद्रकांत बनकर, जुन्नर आंबेगाव संस्थेचे अध्यक्ष संदीप जाधव, खजिनदार सुनिल वाहने, बाळासाहेब वायकर आदी पदाधिकारी, संचालक , सभासद उपस्थित होते.