Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरुर बायपास बनला ‘मृत्यूचा सापळा’; अनधिकृत दुभाजक, भरधाव वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 August 2026, 15:35

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती/प्रतिनिधी: पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिरुर बायपासजवळील रस्ता (बाह्यवळण) अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरील बाह्यवळण परिसरात तुटलेले दुभाजक, दुभाजकाची कमी झालेली उंची, नियमबाह्य वाहतूक, आणि वाहनांचा भरधाव वेग यामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बायपासजवळील हॉटेल संग्रामसमोर मंगळवारी,दि.११ झालेल्या भीषण अपघातात एका उद्योजकासह दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.१९९५ च्या आसपास शिरुर शहराबाहेरुन काढण्यात आलेला बायपास (बाह्यवळण) रस्ता आज अत्यंत धोकादायक बनला आहे. बायपास झाल्यानंतर शिरुर शहर व परिसरात वाढते नागरीकरण, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, शोरूम्स व छोटे छोटे व्यवसाय यामुळे परिसरात मोठी रहदारी वाढली आहे.

या महामार्गावरील बायपासजवळील हॉटेल संग्रामसमोरील अनधिकृतपणे तोडण्यात आलेल्या दुभाजकाजवळ अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. शिरुर शहरातील व्यावसायिकाचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाल्यानंतर माजी आमदार ऍड अशोक पवार यांनी तोडण्यात आलेले दुभाजक कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्त करुन घेतले होते, मात्र अवघ्या काही दिवसातच हे दुभाजक पुन्हा तोडण्यात आले असल्यामुळे तिथून अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहने यु टर्न घेताना दिसून येत आहे.

 

या बायपास रस्त्याला शिरुर शहराच्या उपनगरामधून येणारे अनेक रस्ते जोडण्यात आले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाहतूक वाढलेली दिसत आहे.मात्र स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झेब्रा क्रॉसिंग पट्टे, वाहतूक नियंत्रक दिवे आणि गतिरोधक यांचा पूर्णपणे अभाव असल्याचे दिसून येत आहे.

 शिरुर बायपासवरील (बाह्यवळण) रस्त्यावर केवळ वाहतूक सुरक्षिततेच्या अभावामुळे गेल्या वर्षभरात जवळपास तीसहुन अधिक छोटे मोठे अपघात होऊन नऊ जणांना निष्पाप आपला बळी गमवावा लागला आहे.तर काही जण जखमी झाले असून, यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशी यांना अक्षरशः आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले.

शिरुर बायपास रस्त्यालगत शिरुर शहर व परिसरातील वाढते नागरिकरण आणि मोठया प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. बायपास रस्त्यावरील अनधिकृत दुभाजक संबंधित विभागाने तातडीने कायमस्वरूपी बंद करावेत.तसेच या रस्त्यालगत पाषाणमळा येथील भुयारी मार्ग पुन्हा तातडीने सुरु करण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली असल्याचे शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक अमित कर्डीले यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

Thursday, 13 August 2026, 16:37

बायको रक्ताच्या थारोळ्यात पडून ओरडत राहिली अन् तो पसार झाला! चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात नवरा-बायकोचा तुफान राडा

Thursday, 13 August 2026, 16:13
Next Post

बायको रक्ताच्या थारोळ्यात पडून ओरडत राहिली अन् तो पसार झाला! चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात नवरा-बायकोचा तुफान राडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.