लोणी काळभोर : कोलवडी-साष्टे (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शीतल अविनाश भाडळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवडणूक प्रक्रिया सरपंच विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोलवडी-साष्टे (ता. हवेली) ग्रामपंचायती पंचवार्षिक निवडणुकीत माजी पंचायत समितीचे सदस्य पोपट गायकवाड व यशवंत कारखान्याचे माजी संचालक रामदास गायकवाड यांच्या शहानशहावली परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. लोकनियुक्त सरपंचासह १० सदस्य निवडून आले आणि कोलवडी-साष्टेची धुरा लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड विराजमान झाले.
त्यानंतर कोलवडी-साष्टे (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी (ता.२२) पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया सरपंच विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी शीतल भाडळे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनायक गायकवाड यांनी उपसरपंचपदी शीतल भाडळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
या निवडणुकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोरे यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून तर महेश वाघमारे यांनी सहाय्यक निवडणूक निरीक्षक म्हणून कामकाज पहिले. तसेच या निवडणुकीचे शासकीय कामकाज ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे यांनी पाहिले.
दरम्यान, उपसरपंचपदी शीतल भाडळे यांनी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विनायक गायकवाड यांनी शीतल भाडळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य पोपट गायकवाड व यशवंत कारखान्याचे माजी संचालक रामदास गायकवाड, मिलापचंद गायकवाड, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, जयसिंग गायकवाड, सणसवाडीचे माजी सरसंच अजित दरेकर, काळूराम दरेकर, रामदास दरेकर, माजी सरपंच सतीश गायकवाड, दिलीप गायकवाड, बाळासाहेब भाडळे, पंकज गायकवाड, विलास भोसले, शंकर मदने, बाळासाहेब पवार, दिनेश गायकवाड, अविनाश रिकामे, जयसिंग गायकवाड, सुदाम गायकवाड, देविदास गायकवाड, रामदास गायकवाड, विश्वास गायकवाड, रमेश गायकवाड, सुभाष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गावाच्या विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच शीतल भाडळे यांनी केले आहे.