Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पती होता, तरीही दोन प्रियकर; Ex पुन्हा आला आयुष्यात अन् पती आणि 1 प्रियकराने मिळून केली तिसऱ्याची हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 29 July 2026, 14:19

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे प्रेमसंबंधातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पती आणि दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना नावाच्या महिलेचे अमित नावाच्या तरुणासोबत मागील 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही काळानंतर तिची ओळख लोकेश नावाच्या दुसऱ्या तरुणाशी झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्यातही प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर अमित हा आपल्या आयुष्यात अडथळा ठरत असल्याचे कल्पनाला वाटू लागले.

अमितची कायमची सुटका करण्यासाठी कल्पनाने कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या योजनेत तिने आपल्या पती संजू आणि प्रियकर लोकेश यांनाही सहभागी करून घेतले. 30 एप्रिलच्या रात्री तिने अमितला काही कारण सांगून घरी बोलावले. तो घरात आल्यानंतर तिघांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला.

लोखंडी वस्तूने मारहाण केल्यामुळे अमितचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह प्लॅटिना दुचाकीवर ठेवून कासिमपूर कालव्यात फेकून दिला. काही दिवसांनी, 2 मे रोजी पोलिसांना कालव्यात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. त्यानंतर सुरू झालेल्या तपासातून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

 

तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी कल्पना आणि लोकेश या दोघांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली लोखंडी वस्तू आणि प्लॅटिना दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या हत्याकांडात सहभागी असलेला महिलेचा पती संजू अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे अलीगढमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! ताम्हिणी घाट गुरुवारपासून पुन्हा सुरू; पण 'या' वाहनांना परवानगी नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp