दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून व शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी दिली.
शरद जामदार म्हणाले की, ‘भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी वेळोवेळी पक्षाने दिलेले आदेश धुडकावत पक्षविरोधी भूमिका घेतल्या होत्या. ते अनेक बैठकींना अनुपस्थित होते. वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्या.
या सर्व घटनेची दखल घेऊन पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून तसेच सदस्यपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे, असे सांगितले.