Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती येथील महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 26 February 2026, 13:56

बारामती, ता. 26 : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पीडित “निर्भया” हिला न्याय मिळवून देण्यात बारामती पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेगवान तपास, पुराव्यांची शिस्तबद्ध मांडणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी पाठपुरावा यामुळे आरोपीला अखेर 10 वर्षांची सश्रम शिक्षा ठोठावण्यात आली. आण्णा सुरेश ओव्हाळ (वय 43, रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा) असे 10 वर्षे सश्रम करावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून 2024 रोजी आरोपी आण्णा सुरेश ओव्हाळ याने पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेने धैर्याने पुढे येत तक्रार नोंदवली आणि त्यानुसार गुन्हा भा.द.वि. कलम 376(2)(r) अन्वये तत्काळ दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संध्याराणी देशमुख यांनी तपासाची सूत्रे हातात घेत साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक बाबींचे संकलन करून आरोपीविरुद्ध ठोस व विश्वासार्ह पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

सदर प्रकरणाची सुनावणी बी. डी. शेळके (जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बारामती) यांच्या न्यायालयात (सेशन केस नं. 163/2024) झाली असता, न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत भा.द.वि. कलम 376(2)(F) अंतर्गत 10 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड अशी कठोर शिक्षा सुनावली. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता कमलाकर एस. नवले यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सेशन कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक कसपटे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे तसेच कोर्ट कर्मचारी आवटे व कोकरे यांनीही मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, बारामती शहर पोलिसांनी ठाम संदेश देत महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही. गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल व महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत बारामती पोलीसांची शून्य सहनशीलतेची भूमिका कायम राहील असा महत्वपूर्ण संदेश दिला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात टँकर ठरतोय ‘यमदूत’! वानवडीत महिलेचा भीषण अपघातात मृत्यू, 48 तासांत दोन बळी गेल्याने शहरात खळबळ

Tuesday, 7 April 2026, 13:02

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52
Next Post
Manoj Jarange Patil: Is a new "pattern" being created against Manoj Jarange in Mumbai? A woman is also involved; said "Conspiracy against me.." Jarange's claim creates a stir

Manoj Jarange Patil: मुंबईत रचला जातोय मनोज जरांगेंच्या विरोधात नवा "पॅटर्न"? एका महिलेलाही समावेश; म्हणाले "माझ्याविरोधात कटकारस्थान.." जरांगेंच्या दाव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.