Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरदवाडी घाटातील गोळीबार, खून प्रकरणी सात आरोपी जेरबंद

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 4 June 2026, 17:55

शिरूर: शिरूर तालुक्यातील सरदवाडी घाटातील राजस्थान ढाब्यासमोर घडलेल्या थरारक गोळीबार व खून प्रकरणाचा उलगडा करण्यात शिरूर पोलिसांना यश आले असून,या प्रकरणातील सात आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता,न्यायालयाने ९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोमवारी १ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास न्हावरा फाटा ते न्हावरा रस्त्यावर सरदवाडी घाटात राजस्थान ढाब्यासमोर टोयोटा टायझर कारमधून प्रवास करणारे उमेश जगदाळे,केदार झाडगे आणि विशाल काळे या तिघांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. किया सोनेट कार आणि दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी चित्रपटाला साजेशी थरारक कारवाई करत टोयोटा कारला धडक दिल्यानंतर गोळीबार केला.त्यानंतर झालेल्या हल्ल्यात विशाल काळे याचा मृत्यू झाला होता, तर केदार झाडगे जखमी झाला होता.या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली होती.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा तसेच विविध कलमांच्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी १)इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पन्दी (वय २४, रा.वाघोली,ता.हवेली,जि.पुणे) २) अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २६, रा.बकोरी फाटा,गाडेवस्ती,वाघोली) ३) सिद्धार्थ उर्फ बाल्या तुकाराम शिंदे(वय २१,रा. बाबुरावनगर,शिरूर) ४)पांडुरंग बालाजी कांबळे (वय २६,रा.रामलिंग रोड,शिरूर) ५) आदित्य दीपक कांबळे(वय १९, रा.वाघोली,पुणे) ६) देवानंद शिवाजी चव्हाण (वय २७,रा.मारुती आळी,शिरूर, पुणे) आणि ७) अभिषेक उर्फ घ्या हनुमान मिसाळ (वय २५,रा.सोनार आळी, शिरूर, पुणे यांना अटक पोलिसांनी अटक केली आहे.

 

अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता,माननीय न्यायालयाने मंगळवार-९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.या प्रकरणामागील नेमके कारण,कटाचा सूत्रधार,वापरण्यात आलेली शस्त्रे तसेच इतर फरार आरोपींचा सहभाग याबाबत शिरूर पोलीस सखोल तपास करीत आहेत.

शिरूर परिसरात घडलेल्या या खळबळजनक घटनेचा तपास वेगाने सुरू असून,आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंडमध्ये ‘लव्ह जिहाद’? 11 वीतील हिंदू मुलीला चाकूचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न

Friday, 4 September 2026, 12:10

हरिचंद्री गावाजवळ भीषण अपघात; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी

Friday, 4 September 2026, 11:45

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण; शरद पवार यांनी हल्ल्याचा केला निषेध

Friday, 4 September 2026, 11:41

तो आला अन् 50 जणांच्या घोळक्यात माजी नगरसेवकाला लक्ष्य करत धारदार शस्त्राने केला हल्ला; सोलापूरातील घटना

Friday, 4 September 2026, 11:12

कर्मचाऱ्यांनो सावधान! ऑफिसच्या वेळेत सोशल मीडिया वापरणे पडणार महागात? येणार नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती

Friday, 4 September 2026, 10:19

ISRO ची मोठी कामगिरी! EOS-05 चे यशस्वी प्रक्षेपण, 36 हजार किमीवरून पाक-चीनवर ठेवणार नजर

Friday, 4 September 2026, 10:00
Next Post

हडपसर महावितरण कार्यालयात भष्टाचाराचा पर्दाफाश! अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला 7,500 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp