Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहिल्यानगरमध्ये खळबळ! विद्युत पोलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; पत्नीच्या गंभीर आरोपामुळे शहरात तणाव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 August 2026, 17:10

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धीरज परदेशी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणातील चार संशयितांना अटक केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरातील कबरस्तानात विद्युत पोलचे काम सुरू होते. यावेळी कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी हे काम करत असताना काही जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाले.

जखमी धीरज यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या चार जणांना अटक केली आहे. मात्र, धीरज परदेशी यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ल्यामागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत.

 

दरम्यान, धीरज हे हिंदुत्ववादी विचारांचे असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. मात्र, या आरोपाची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे हल्ल्याचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचा इशारा देण्यात आल्याने पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, ज्या कबरस्तान परिसरात आपल्या पतीवर हल्ला झाला, त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा, अशी भावनिक मागणी धीरज परदेशी यांच्या पत्नीने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातून तरुणाच अपहरण; समृद्धी महामार्गावर 3 किमी थरारक पाठलाग, एका तरुणीसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 3 September 2026, 11:43

गुटखा विक्रेत्याला मोठा दणका! वढू खुर्दमध्ये FDA ची धाड; 165 पाऊच जप्त

Thursday, 3 September 2026, 11:34

हायकोर्टात ठाकरे सेनेला दणका! विशाखा राऊतांची याचिका फेटाळली; नगरसेवकपदावर टागंती तलवार

Thursday, 3 September 2026, 11:12

पुणेकरांनो, बसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले

Thursday, 3 September 2026, 11:07

पुण्यात भाजप नेत्याच्या घराबाहेर मध्यरात्री राडा! दोन चारचाकींची तोडफोड, CCTV च्या वायरही तोडल्या..

Thursday, 3 September 2026, 10:54

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; अंतरवालीत मराठा आंदोलकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 10:38
Next Post

उरुळी कांचन-सासवड मार्गावर वाघापूर हद्दीत पिकअप पलटी; मद्यधुंद चालकाचा रस्त्यावर थरार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp